Biostad Roko
Description
Biostad Roko या बुरशीनाशकामध्ये थायोफेनेट मिथाईल 70% डब्ल्यू पी हा बेन्झीमिडॅझोल या गटातील आंतरप्रवाही रासायनिक घटक असतो, हे बुरशीनाशक फवारणीनंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे व आळवणी किंवा ठिबक द्वारे दिल्यानंतर मुळांच्या रंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या पेशींद्वारे वनस्पतींच्या सर्व भागापर्यंत पोहोचते.
हे वनस्पतींच्या पर्णरंद्रामधून किंवा मुळांच्या रंद्राद्वारे तसेच वनस्पतींच्या जखमांमधून आत मध्ये प्रवेश केलेल्या बुरशींचा संपूर्णपणे नायनाट करते. तसेच कोणत्याही बुरशीला आत मध्ये प्रवेश करू देत नाही.
हे बुरशीच्या पेशींच्या आवरण निर्मितीमध्ये व्यत्यय आणते. ज्यामुळे बुरशीची चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही,ज्यामुळे बुरशीचे बीजाणू निष्क्रिय होतात. या बुरशीनाशकाचा वापर कोणतेही बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व आल्यावर उपचारात्मक नियंत्रणासाठी केला जातो. हे बुरशीनाशक फवारणी,आळवणी व ठिबक द्वारे देण्यासाठी वापरले जाते.
या बुरशीनाशकाचे प्रमाण फवारणीसाठी एक ग्रॅम प्रति लिटर,आळवणीसाठी एक ग्रॅम प्रति लिटर,ठिबक द्वारे देण्यासाठी 500 ग्रॅम प्रति लिटर असे वापरावे. याचा वापर सर्व पिकांमध्ये(काही अपवाद) केला जातो.
हे पानांवर येणारी काळे ठिपके,भुरी जिवाणूजन्य ठिपके व करपा,अंथराकोज करपा,रोप मर,फ्युसारियाम मर,यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण करते. या बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकांवर रोप लागवडीनंतर दहा दिवसांनी म्हणजेच दुसऱ्या फवारणी मध्ये घेतल्यास पानांवर येणारे काळे ठिपके या बुरशीजन्य रोगावर प्रभावी नियंत्रण मिळते.
या बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकांत (टोमॅटो वांगी वेल वर्गीय पिके)रोप लागवडीनंतर तीस दिवसांनी केल्यास भुरी या बुरशीजन्य रोगावर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. या बुरशीनाशकाचा वापर रोप मर,फ्युझारियम मर यांसारख्या बुरशीजन्य रोगांची प्राथमिक लक्षणे दिसल्यास मॅन्कोझेब या बुरशीनाशकाबरोबर करावा.
या बुरशीनाशकाचा वापर पावसाळी वातावरणात कसुगामायसिन किंवा व्हॅलिडामायसिन या जिवाणूनाशकांबरोबर केल्यास जीवाणूजन्य काळे ठिपके या जिवाणूजन्य रोगावर प्रभावी नियंत्रण मिळते.