Actara
Description
Sygenta Actra या कीटकनाशकामध्ये थायमीथॉग्जाम 25% डब्ल्यू जी हा निऑनिकोटींऑइड गटातील अंतरप्रवाही रासायनिक घटक असतो. हे किटकनाशक फवारणीनंतर पानांच्या पर्ण रंद्रद्वारे व आळवणी द्वारे दिल्यानंतर मुळांच्या रंद्रद्वारे वनस्पतींच्या आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या वाहिन्यांद्वारे सर्व भागांमध्ये पोहोचते.हे किडींच्या चेतासंस्थावर विपरीत परिणाम करते, त्यांच्या कार्यामध्ये व्यत्त्यय आणते त्यामुळे किडी अपंग होतात व त्यांचे खाणे बंद होऊन त्या मरण पावतात.
याचा वापर किडींच्या प्रतिबंधात्मक, उपचारात्मक नियंत्रणासाठी केला जातो. हे कीटकनाशक फवारणीद्वारे आळवणीद्वारे व ठिबकद्वारे दिले जात.
हे कीटकनाशक फवारणीद्वारे 0.5 ग्रॅम प्रति लिटर, आळवणीसाठी 0.5 ग्रॅम प्रति लिटर व ठिबक साठी 200 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरतात. याचा वापर सर्व पालेभाज्या व हंगामी पिकांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात केला जातो. लहान आकाराच्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण करते.
या बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकांमध्ये पहिल्या आळवणी मध्ये केल्यास सुरुवातीच्या टप्प्यात कोवळ्या पानांवरील रसशोषक किडींचा प्रभावी, प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. मिरची पिकामध्ये येणाऱ्या ब्लॅक थ्रिप्स या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी या किटकनाशकाचा वापर 200 ग्रॅम प्रति एकर असा ठिबक द्वारे करावा.
भाजीपाला पिकात रोप लागवडीनंतर 30 दिवसात या किटकनाशकाचा वापर कराटे या किटकनाशकांबरोबर केल्यास रसशोषक किडी व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. या किटकनाशकाचा वापर कांदा या पिकात केल्यास सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या किडींवर नियंत्रण मिळते.