Fantac Plus
Description
Fantac plus हे coromandal कंपनीचे पोषक उत्पादन आहे,यामध्ये विविध प्रकारचे ॲमिनो ऍसिड,प्रोटीन्स,विटामिन्स असतात.जे पिकावर आलेला जैविक अजैविक ताण कमी करून पिकाच्या वाढीस व पिकाच्या फुलधारणेसाठी मदत करतात.
या उत्पादनाचा वापर आपण फक्त फवारणीसाठी करू शकतो,याचे प्रमाण फवारणीसाठी 1 ml प्रति लिटर असे घ्यावे..याचा वापर सर्वच पिकांमध्ये सर्व अवस्थांमध्ये केला जातो,परंतु फूलअवस्थेमध्ये याचा वापर केल्यास फुलांची संख्या ही जोमदार वाढते.
याचा वापर फवारणी द्वारे केल्यामुळे पिकावर येणारा जैविक,अजैविक ताण कमी होऊन,पिकाच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया या जलद गतीने होण्यास मदत होते.याचा वापर केल्यामुळे झाडाची उंची वाढते,नवीन फुटवे निघतात,पाणी हिरवीगार,रुंद,पसरट होतात.तसेच नवीन फुलांची संख्या वाढते व फुलगळ होत नाही.
याचा वापर रोप लागवडीनंतर पहिल्या फवारणीमध्ये केल्यास रोपांवर पुनर्लागवडनंतर येणारा जैविक व अजैविक ताण कमी होऊन रोपे लवकर सेट होतात.याचा वापर टोमॅटो,मिरची,वेलवर्गीय पिके यांसारख्या पिकांमध्ये फुलावस्थेत केल्यास पिकावर येणारा जैविक,अजैविक ताण कमी होतो फुलांची संख्या वाढते व फुलगळ होत नाही.हे कोणत्याही पिकास पाणी कमी पडल्यानंतर किंवा जास्त झाल्यानंतर येणारा ताण कमी करून त्या विकास तग धरण्यास मदत करते.