Isabion
Description
Isabion हे Syngenta कंपनीचे पोषक उत्पादन आहे.यामध्ये विविध प्रकारचे ऍमिनो ऍसिड व एन्झायम्स असतात,जे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी करून पिकाच्या वाढीस मदत करतात.
हे उत्पादन आपण फवारणी,आळवणी व ठिबक द्वारे देण्यासाठी वापरू शकतो,याचे प्रमाण फवारणीसाठी 2 ग्रॅम प्रति लिटर,आळवणीसाठी 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर व ठिबक द्वारे देण्यासाठी एकरी 1 लिटर असे घ्यावे.याचा वापर सर्वच पिकांमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये करावा.
याचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ होते,रोपांची ऊंची वाढते,नवीन फुटवे निघतात,पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.हे पिकावर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करते ज्यामुळे फुलांची संख्या वाढते व फुलगळ होत नाही.
याचा वापर भाजीपाला पिकांत रोप लागवडीनंतर पहिल्या अळवणी मध्ये केल्यास रोग पुनरलागवड नंतर रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी होतो व पांढऱ्या मुळ्यांची जोमदार वाढ होते. ज्यामुळे रोपे लवकर सेट सेट होण्यास मदत होते.याचा वापर टोमॅटो,मिरची,वेलवर्गीय पिके यांसारख्या पिकांमध्ये फुलावस्थेत केल्यास पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी होतो.ज्यामुळे फुलांची गळ होत नाही तसेच नवीन फुलांची संख्या वाढते. याचा वापर भाजीपाला पिकांत फळ फुगवण्याच्या अवस्थेत फवारणी द्वारे किंवा ठिबक द्वारे केल्यास फळांचा आकार गुणवत्ता व वजन वाढते.हे कोणत्याही पिकास पाणी कमी पडल्यानंतर किंवा जास्त झाल्यानंतर येणारा ताण कमी करून त्या विकास तग धरण्यास मदत करते.