कांदा बियाणे उगवत असताना रोपे पिवळे पडत आहेत कारणे व उपाययोजना काय कराव्यात ?
✅कांदा बियाणे पेरणीनंतर सात ते आठ दिवसांनी जमिनीच्या वर उगवून येतात. त्यातील काही बियाणे उगवत असताना रोपे पिवळी पडतात.
कांदा बियाणे उगवत असताना रोपे पिवळी पडण्याची अनेक कारणे आहेत ती खालील प्रमाणे,
नायट्रोजन कमतरता
नायट्रोजनची कमतरता असेल तर कांदा बियाणे उगवत असताना पिवळे पडू शकते, परंतु ही शक्यता खूप कमी असते कारण कांदा रोपवाटिका ही सप्टेंबर,ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये बनवली जाते. या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण हे ढगाळ असते व रिमझिम स्वरूपाचा पाऊस असतो अशा वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असते, त्यामुळे नायट्रोजनची कमतरता पासून रोपे पिवळी पडायची लक्षणे क्वचित दिसून येतात.
पाणी नियोजनातील चूक
अधिक किंवा कमी पाणी दिल्यामुळे जमिनीत वाफसा राहत नाही व रोपांच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे निघणारे कोंब पिवळे पडतात.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
बियाणे अंकुरत असताना जर पीथीयम, फुजारीयम, कोलेटोट्रीचीयम या बुरशींचा प्रादुर्भाव बियाण्यांवर झाला तर बियाण्यातून निघणारे कोंब हे पिवळे निघू शकतात व कालांतराने रोपांची मर होते.
वातावरणाचा ताण
खूप उष्णता किंवा जास्त थंड हवामानामुळे रोपे ताणाखाली येतात, ज्यामुळे रोपे उगवत असताना पिवळी पडतात.
उपाययोजना
या अडचणींवर उपाययोजना करताना उपाययोजना या एकात्मिक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक करायच्या आहेत.
एकात्मिक उपाययोजना
✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे एकत्रितपणे लागवडी अगोदर येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करणे होय.
✅यासाठी सर्वप्रथम शेतमशागत करताना व्यवस्थित करावी जेणेकरून जमीन भुसभुशीत होते व पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि नायट्रोजन कमतरता भासत नाही. तसेच जमीन निवडताना पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा जेणेकरून शेत लवकर वाफस्यावर येईल व मुळांची कार्यक्षमता वाढेल.त्यामुळे रोपे उगवताना पिवळी पडत नाहीत.कांदा रोपवाटीकेसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटो वर क्लिक करावे.
https://www.farmspotagro.com/crop_article/onion-nursury-land-selection/
✅तसेच मशागती मुळे सुद्धा महत्व आहे,योग्य प्रकारे मशागत केल्यामुळे बुरशीचे बीजाणू निष्क्रिय होतात व रोपे उगवताना बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिवळी पडतात ती पडणार नाहीत.तसेच जमीन निवडताना पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा जेणेकरून शेत लवकर वाफस्यावर येईल व मुळांची कार्यक्षमता वाढेल.कांदा रोपवाटीकेसाठी शेताची निवड केल्यानंतर शेताची मशागत कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर किंवा फोटो वर क्लिक करावे.
https://www.farmspotagro.com/crop_article/onion-nursury-land-prapration/
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे अडचण येण्याच्या अगोदर करायच्या उपाययोजना होय. यासाठी अन्नद्रव्य कमतरता भरून काढण्यासाठी मशागतीच्या वेळी योग्य प्रकारे खत नियोजन करावे.
त्यासाठी खालील रासायनिक खत नियोजन करावे.
DAP (Diammonium Phosphate)
प्रमाण – 15 किलो 7 ते 10 गुंठेसाठी
SSP (Single Super Phosphate)
प्रमाण – 20 किलो 7 ते 10 गुंठेसाठी
MOP (Murate of Potash)
प्रमाण – 15 ते 20 किलो 7 ते 10 गुंठेसाठी
Sulpher -90 WG
प्रमाण – 2 किलो 7 ते 10
Zinc Sulphate
प्रमाण – 2 ते 3 किलो 7 ते 10 गुंठे साठी
✅नर्सरीमध्ये पाणी नियोजन करताना मातीचा प्रकार, वातावरण यांसारख्या गोष्टींचा विचार करून योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन करावे. जर माती हलकी म्हणजेच कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी असेल तर दोन पाणी मधील अंतर कमी ठेवावे, जेणेकरून रान सतत वाफस्यावर राहील. अशाप्रकारे पाण्याचे नियोजन करावे. तसेच जर जमीन जाड म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असणारी असेल तर दोन पाण्यांमधील अंतर जास्त ठेवावे जेणेकरून रान सतत वाफस्यावर राहील व बी उगवताना रोपे पिवळी पडणार नाहीत.
https://www.farmspotagro.com/crop_article/onion-nursury-water-management/
✅नर्सरी मध्ये रोपे पिवळे पडण्याचे एक कारण हे बुरशीचा प्रादुर्भाव हे असते. त्यासाठी बी पेरणीपूर्वी जर बियाण्यांवर बीज प्रक्रिया केली तर ही अडचण येणार नाही. बीज प्रक्रिया कशासाठी करावी, कोणत्या उत्पादनांची करावी व कशी करावी याविषयी माहिती घेण्यासाठी खाली निळा रंगाच्या लिंक वरती क्लिक करा.
https://www.farmspotagro.com/crop_article/onion-seed-treatment/
✅काही परिस्थितीमध्ये बीज प्रक्रिया केली नसेल तर बियाणे उगवून आल्यानंतर लगेच खालील फवारणी करावी. याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वरती क्लिक करा.
https://www.farmspotagro.com/product/tata-master-actara-rootstar-drenching-spray-kit/
उपचारात्मक उपाययोजना
✅उपचारात्मक नियंत्रण म्हणजे अडचण आल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करायच्या उपायोजना होय.
✅जर तुमच्या शेतात या अडचणी येत असतील तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खालीलपैकी एक फवारणी करणे गरजेचे आहे.
✅फवारणी करताना शेत ओले असावे व फवारणी नौजल मधील रबर काढून दाट फवारणी करावी.
✅फवारणी किट मधील काही किट हि आळवणी साठी वापरली जातात,परंतु त्यांचा वापर कांदा पिकात फवारणीसाठी केला तरी चालेल.
खालील पैकी एक फवारणी करा.
-
Tata Master Actara RootStar Spray Kit
₹786.00 – ₹1,600.00 Buy Now -
RidomilGold Marshal GreenBee Spray Kit
Original price was: ₹1,648.00.₹1,253.00Current price is: ₹1,253.00. Buy Now -
Saaf - Admire - Root Aster Drenching Kit
₹762.00 – ₹1,600.00 Buy Now -
Roko - Actara - Root Star Drenching Kit
₹741.00 – ₹1,487.00 Buy Now -
Bavistin Karate Stopit Spray Combo Kit
Original price was: ₹1,305.00.₹980.00Current price is: ₹980.00. Buy Now -
Matco Gold Admire RootAster Drenching Kit
₹1,237.00 – ₹2,450.00 Buy Now