सतत धुके पडल्यामुळे कांदा रोपांवर नर्सरीमध्ये काय अडचणी येतात व त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
अडचणी
ज्यावेळेस हिवाळी वातावरण असते तेव्हा सकाळच्या वेळी धुके पडत असते त्यामुळे रोपांच्या पाती या ओल्या होतात, त्यामुळे खालील अडचणी येतात.
बुरशीजन्य रोग प्रादुर्भाव
✅सतत धुके पडल्यामुळे कांदा रोपांच्या पाती ओल्या होतात व त्या ओलाव्यामुळे पातींवर बोटट्रीस करपा, डाऊनी, जांभळा करपा,स्टेमफायलियम करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होतो.
✅तसेच सतत धुके पडल्यामुळे जमिनीतून पसरणाऱ्या पिथियम, फुजारीयम या बुरशींचा प्रादुर्भावामुळे रोपांची मर होते, तसेच रोपे पिवळी पडतात त्याचबरोबर Colletotrichium या बुरशीमुळे रोपांना पिळ पडतो.
किडींचा प्रादुर्भाव
✅सतत धुके पडल्यामुळे पोषक वातावरण तयार झाल्यामुळे कांदा रोपांवर मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
प्रकाश संश्लेषण प्रक्रिया बाधित होते
✅रोपांवर बुरशीजन्य रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हरितकणांचे प्रमाण कमी होते व त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर कमी होतो व रोपांची वाढ खुंटते.
अन्नद्रव्यवहन बाधित होते
✅सतत पडणाऱ्या धुक्यामुळे बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे अन्नद्रव्यव वहन करणाऱ्या झायलम व फोलम पेशींचे (वाहिन्यांचे)नुकसान होते व त्यामुळे रोपांची वाढ आणि विकास थांबतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
सतत धुके पडत असेल तर कांदा पिकावर येणाऱ्या अडचणी येऊ नयेत म्हणून खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
✅धुके पडल्यानंतर सकाळच्या वेळी पातळ सुती कपड्याने किंवा बारदानाच्या पोत्याने सर्व धुके साफ करावे जेणेकरून धुके साफ झाल्यामुळे रोपांवर ओलावा होणार नाही व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोपांवर होणार नाही.
✅धुके पडल्यानंतर सकाळच्या वेळी तुषार सिंचन असेल तर ते चालू करून सर्व दव धुवून काढावेत, जेणेकरून पानांवर असणारे दव राहणार नाहीत. त्यामुळे रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
✅तसेच जलसिंचन चालू केल्यामुळे मावा या किडीचे कोष पातीवरून खाली जमिनीवर येतील व या किडीचा प्रादुर्भाव प्राथमिक टप्प्यात रोखला जाईल.
✅धुके पडल्यामुळे खालीलपैकी एक फवारणी करावी जेणेकरून बुरशीजन्य रोग व किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे नियंत्रण मिळेल.
नियंत्रणात्मक उपाययोजना
✅रोपांवर वरील अडचणी दिसत असतील तर खालीलपैकी एक फवारणी करावी.