Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 3.कांदा रोपवाटीकेत येणाऱ्या अडचणी

कांदा रोप वाटीकेत रोपांना पीळ पडत आहे यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात?

कांदा रोपांना पिळ पडण्याची करणे 

✅कांदा रोपांना पिळ पडण्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
नायट्रोजनचे अतिप्रमाण
ज्यावेळेस नायट्रोजन मोठ्या प्रमाणात वातावरण व जमिनीतून शोषित केला जातो तेव्हा ऑक्सिजनचे प्रमाण वाढते व कांद्याला पिळ पडणे ही अडचण दिसून येते.
बुरशींचा प्रादुर्भाव
जमिनीमध्ये असणाऱ्या colletotrichiumfusarium या बुरशींच्या प्रादुर्भाव बियाणे उगवत असताना झाला तर रोपांना पीळ पडतो असे दिसून आले आहे. 

एकात्मिक उपाययोजना 

✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे एकत्रितपणे लागवडी अगोदर येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करणे होय.
सर्वप्रथम जमिनीची निवड योग्य प्रकारे करावी,जास्त किंवा कमी पानी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जमीन निवडू नये. जमीन हि मध्यम पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी निवडावी,उदा. तांबट,काळी-तांबट; तसेच जमीन निवडताना अशा जमिनीची निवड करा जेणेकरून पाण्याचा निचरा लवकर होईल व जमीन लवकर वाफस्यावर येईल.अशा जमिनीत पांढऱ्या मुळांची कार्यक्षमता वाढते व अन्नद्रव्ये शोषण वाढते,जमीन निवड योग्य प्रकारे केल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही,नायट्रोजन कमतरता भासत नाही,मुळांची कार्यक्षमता वाढते. व बियाणे उगवत असताना किंवा उगवल्यानंतर पिवळे पडत नाहीत.
कांदा रोपवाटीकेसाठी जमिनीची निवड कशाप्रकारे करावी या विषयावर माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
कांदा रोपवाटिकेसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी?
✅त्याचबरोबर निवड केलेल्या जमिनीची मशागत व्यवस्थित करावी,मशागत व्यवस्थित केल्यामुळे बुरशीचे बिजाणू निष्क्रिय होतात. तसेच जमीनीची मशागत केल्यामुळे जमीन भुसभुशीत होते व पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते ज्यामुळे बियाण्यास ऑक्सीजन पुरवठा होतो तसेच मुळांची कार्यक्षमता वाढते जमीनिमधून अन्नद्रव्य शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळे नायट्रोजनची कमतरता  भासत नाही,यामुळे जमिनीची मशागत योग्य प्रकारे केल्यामुळे रोपे उगवत असताना पिवळी पडत नाहीत.
कांदा रोपवाटीका बनवत असताना जमिनीची मशागत कशी करावी या विषयावर माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत कशाप्रकारे करावी?

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

बिजप्रक्रिया
✅कांदा बियाण्यास जर योग्य प्रकारे बीजप्रक्रिया केली तर बियाण्याचे जमिनीत असणाऱ्या बुरशींपासून संरक्षण होते व त्यामुळे बियाण्याचे नुकसान होत नाही. त्यामुळे पेरलेले जास्तीत जास्त बियाणे उगवून येते व बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
कांदा बियाण्याची बीजप्रक्रिया कशी करावी व कोणत्या उत्पादनांची करावी याची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे.
उन्हाळी कांदा बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी कोणत्या उत्पादनांची बीजप्रक्रिया करावी व ती कशाप्रकारे करावी?

नायट्रोजनचा वापर कमी करणे
✅कांदा रोपवाटिका ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये बनवतात.या काळात वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रोपवाटिका बनवताना नायट्रोजन युक्त खतांचा वापर करू नये. ज्यामुळे नायट्रोजनचे प्रमाण वाढणार नाही व रोपांना पीळ पडणार नाही.
फवारणी नियोजन
जेव्हा बियाणे  उगवून येतात तेव्हा त्यावर  बुरशीनाशकाची फवारणी केली तर त्यावर जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशींचा प्रादुर्भाव होणार नाही व रोपांना पिळ पडणार नाही.
फवारणीची माहिती घेण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे. 

उपचारात्मक उपाययोजना 

जर तुमच्या कांदा रोपांना पीळ पडत असेल तर त्यावर उपचारात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी खालीलपैकी एक फवारणी करावी.