Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 3.कांदा रोपवाटीकेत येणाऱ्या अडचणी

कांदा बियाणे उगवत असताना किंवा उगवल्यानंतर रोपांची मर होत असेल तर त्यावर काय उपाययोजना कराव्यात?

मर होण्याची कारणे 

✅कांदा बियाणे जमिनीमध्ये पेरल्यानंतर उगवत असताना बियाण्यांवर, बियाण्यातून बाहेर येणाऱ्या अंकुरावर तसेच बियाण्यातून बाहेर येणाऱ्या मुख्य मुळावर पीथीयम गटातील बुरशींचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे बियाणे खराब होणे, बियाणे उगवत असताना मर होणे, बियाणे उगवल्यानंतर रोपांची मर होणे या समस्या येतात.

एकात्मिक उपाययोजना 

✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे एकत्रितपणे लागवडी अगोदर येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करणे होय.
✅सर्वप्रथम जमिनीची निवड योग्य प्रकारे करावी,जास्त किंवा कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जमीन निवडू नये. जमीन हि मध्यम पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी निवडावी, उदा. तांबट,काळी-तांबट; तसेच जमीन निवडताना अशा जमिनीची निवड करा जेणेकरून पाण्याचा निचरा लवकर होईल व जमीन लवकर वाफस्यावर येईल.अशा जमिनीत पांढऱ्या मुळांची कार्यक्षमता वाढते व अन्नद्रव्ये शोषण वाढते ,जमीन निवड योग्य प्रकारे केल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही,नायट्रोजन कमतरता भासत नाही,मुळांची कार्यक्षमता वाढते व बियाणे उगवत असताना किंवा उगवल्यानंतर पिवळे पडत नाहीत.
कांदा रोपवाटीकेसाठी जमिनीची निवड कशाप्रकारे करावी या विषयावर माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
कांदा रोपवाटिकेसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी?

✅त्याचबरोबर निवड केलेल्या जमिनीची मशागत व्यवस्थित करावी,मशागत व्यवस्थित केल्यामुळे बुरशीचे बिजाणू निष्क्रिय होतात. तसेच जमीनीची मशागत केल्यामुळे जमीन भुसभुशीत होते व पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते ज्यामुळे बियाण्यास ऑक्सीजन पुरवठा होतो तसेच मुळांची कार्यक्षमता वाढते जमीनिमधून अन्नद्रव्य शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळे नायट्रोजनची कमतरता  भासत नाही,यामुळे जमिनीची मशागत योग्य प्रकारे केल्यामुळे रोपे उगवत असताना पिवळी पडत नाहीत.
कांदा रोपवाटीका बनवत असताना जमिनीची मशागत कशी करावी या विषयावर माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत कशाप्रकारे करावी?

प्रतिबंधात्मक उपाययोजना

 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे अडचणी येण्याअगोदर त्या अडचणी येऊ नये म्हणून करायच्या उपाययोजना होय.
बीज प्रक्रिया करणे
✅जेव्हा बियाण्यांवर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली जाते तेव्हा बियाण्यांवर जमिनीमध्ये असणाऱ्या कोणत्याही बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही ज्यामुळे बियाणे उगवत असताना रोग मर होत नाही.
बीज प्रक्रिया कशी करावी व कोणत्या उत्पादनांची करावी यासाठी खालील निळा रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
उन्हाळी कांदा बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी कोणत्या उत्पादनांची बीजप्रक्रिया करावी व ती कशाप्रकारे करावी?
फवारणी करणे
✅जेव्हा बियाणे उगवून वर येते तेव्हा त्यावर बुरशीनाशकाची फवारणी केली तर त्यावरती जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशींचा प्रादुर्भाव होत नाही.
✅त्यासाठी बियाणे उगवून आल्यानंतर खालील उत्पादनांची फवारणी करावी.

उपचारात्मक उपाययोजना 

✅उपचारात्मक उपाययोजना म्हणजे अडचण आल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजना होय.
नियंत्रणात्मक उपाययोजना म्हणून अशी अडचण दिसल्यास खालील पैकी एका किटची फवारणी करावी.


 

कांदा रोपवाटीकेत वरीलपैकी कोणतीही एक फवारणी केली असेल तर खालीलपैकी एक फवारणी करावी ?