जबाबदार बुरशी 

✅ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा Peronosporales या बुरशीमुळे होतो.

लक्षणे  

✅ पातीवर पिवळे डाग दिसतात. त्यानंतर कालांतराने डाग मोठे होतात व त्या डागांच्या वर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाच्या बुरशीचा थर दिसतो. जिथे डाग आहे तिथून पात पिचकते व अशा रोपांची वाढ खुंटते.

नुकसान काय करते?

✅ पातीवर डाग आल्यानंतर हरितकणांचे प्रमाण कमी होते व त्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते.ज्यामुळे अन्न निर्मिती थांबते व रोपांची वाढ खुंटते.तसेच पातीवर जखमा झाल्यामुळे अन्नवाहिन्या असणाऱ्या झायलम व फोलम पेशींचे नुकसान होते.ज्यामुळे पाणी व अन्नद्रव्य वहन विस्कळीत होते व प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला अन्नद्रव्य पुरवठा कमी होतो व अशा परिस्थितीमध्ये रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा वेग कमी होतो आणि त्यामुळे रोपांची वाढ खुंटते. तसेच जे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अन्न तयार होते ते अन्न वहन रोपांच्या वाढीच्या भागांना पोहोचत नाही.ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.अशा प्रकारे रोपांचे नुकसान होते.
✅ तसेच  प्रादुर्भाव वाढल्यानंतर नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यासाठी जो आर्थिक खर्च वाढतो व अधिकचे नुकसान होते.

उपाययोजना  

✅ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन न देणे व प्रसार रोखणे यासाठी एकात्मिक, प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एकात्मिक उपाययोजना  

✅ जमिनीची निवड 
✅ बियाणे निवड  
✅ शेताची मशागत 

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

✅ पाणी नियोजन
जर तुम्ही तुषार सिंचन किंवा रेन पाईपद्वारे पाणी देत असाल तर पाणी हे सूर्यप्रकाश असताना द्यावे. ज्यामुळे पातीवर पाणी राहत नाही व या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखला जाईल.

✅ धुके 
ज्यावेळेस सकाळच्या वेळी धुके पडते अशा वेळी बारदान किंवा सुती कापड त्यावर फिरवून त्यावरील धुके घालवावे किंवा धुके पडल्यानंतर सूर्यप्रकाश असताना 10 मिनिटे तुषार सिंचन चालू करावे, ज्यामुळे पातीवर धुक्याचे कण राहणार नाहीत व या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.

✅ फवारणी नियोजन 
कांदा रोपांची नर्सरी ही प्रामुख्याने ऑक्टोंबर, सप्टेंबर व नोव्हेंबर या महिन्यात केली जाते.या महिन्यात मोठ्या प्रमाणावर धुके पडते, ज्यामुळे सतत पाती ओल्या राहतात व या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होतो,तो रोखण्यासाठी खालील उत्पादनांची फवारणी घ्यावी.

उपचारात्मक उपाययोजना 

✅ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन फवारणी नियोजन करणे गरजेचे आहे.