कांदा पिळ रोग
जबाबदार बुरशी
✅ Colletotrichum
✅ Gibberella Moniliformis
या दोन बुरशींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कांद्याच्या रोपांमध्ये IAA, GA या हार्मोन्स (वाढ संप्रेरकांचे) वाढते व त्यांचे प्रमाण वाढल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो व पातीची अवांतर लांब वाढ होणे, पातीला पिळ पडणे या अडचणी दिसतात.
लक्षणे
✅ याचे प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे पातीची लांबलचक वाढ होणे, पात पिवळी पडणे व पातीला पिळ पडणे आहे. त्याचबरोबर पातीच्या कडा पांढऱ्या पडणे , पातींवर पांढरे ठिपके दिसणे, ज्याचे मध्य कालांतराने काळे पडतात.अशा रोपांचा कंद सडून जाऊन रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होते.
पोषक वातावरण
✅ या बुरशीचा प्राथमिक प्रादुर्भाव हा जेव्हा तापमान 23०C ते ३००Cच्या दरम्यान असते व आद्रता ही 80 टक्के पेक्षा जास्त असते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर होतो.
प्रसार
✅ या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात हा जमिनीमध्ये असणाऱ्या अधिकच्या ओलाव्यामार्फत अधिक जलद गतीने होतो. तसेच ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब चे प्रमाण जास्त आहे,अशा जमिनीतून या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात अधिक जलद गतीने होतो.तसेच प्रादुर्भाव झाल्यानंतर ही बुरशी 96 तासात आपले जीवनचक्र पूर्ण करते. ज्यामुळे याचा प्रसार अधिक मोठ्या प्रमाणावर होतो.
वरीलपैकी कोणत्याही एका किटची फवारणी केली असेल तर खालीलपैकी कोणत्याही एका किटची फवारणी करावी.
नुकसान काय होते?
✅ रोपांना पीळ पडल्यामुळे सर्वाधिक नुकसान होते.रोपे व रोपे पूर्नलागवडीचा तसेच प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यासाठी आर्थिक खर्च जास्त होतो.
उपाययोजना
✅ या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वप्रथम बुरशीचा प्राथमिक प्रादुर्भाव रोखणे व बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होण्यापासून रोखणे गरजेचे आहे.
एकात्मिक उपाययोजना
✅ एकात्मिक उपाययोजना म्हणजे या रोपमर अडचणी बरोबर येणाऱ्या इतर अडचणी येऊ नये म्हणून एका वेळेस नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे होय.
बियाणे निवड :
✅एकात्मिक नियोजनामध्ये योग्य प्रकारच्या निरोगी बियाण्यांची निवड केल्यास पीळ पडणे या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाबरोबर इतर बुरशीजन्य रोगांवर सुद्धा नियंत्रण मिळेल.कांदा बियाणे निवड कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करा.
कांदा बियाणे निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?
जमिनीची निवड
✅अशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा लवकर होईल व जमीन लवकर कोरडी होईल.कारण या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात जमिनीत असणाऱ्या अधिकच्या ओलाव्यामार्फत होतो.जमिनीची निवड कशा प्रकारे व कशाचा आधारावर करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करा.
कांदा रोपवाटिकेसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी?
शेतीची मशागत :
✅यासाठी जेव्हा शेताची मशागत करत असतो तेव्हा शेत खोलवर नांगरून घ्यावे व किमान 10 ते 15 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. ज्यामुळे जे जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशीचे बीजाणू आहेत ते सूर्यप्रकाशामुळे निष्क्रिय होतील. तसेच त्यानंतर फणपाळी मारून जे जुन्या पिकांचे, तणांचे अवशेष काडी कचरा बाहेर येतो. तो शेताच्या बाहेर उचलून टाकावा, ज्यामुळे त्याचबरोबर बुरशीचे बिजाणू सुद्धा शेताच्या बाहेर जातील. अशा प्रकारे आपण इतर बुरशीजन्य रोगांबरोबर या बुरशीजन्य रोगांवर एकात्मिक नियंत्रण मिळेल.कांदा रोपवाटीकेसाठी शेताची मशागत कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करावे.
कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत कशाप्रकारे करावी?
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे तो बुरशीजन्य रोग आपल्या शेतात पिकांवर येऊ नये म्हणून उपाययोजना करणे होय. त्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
बीजप्रक्रिया
✅जर बीज प्रक्रिया केली तर बियाण्याचे उगवण्यापूर्वी व उगवल्यानंतर या जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशीपासून संरक्षण होईल व पीळ रोग या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळेल.कांदा बियाण्यावर बीज प्रक्रिया कशा प्रकारे करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करा.
उन्हाळी कांदा बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी कोणत्या उत्पादनांची बीजप्रक्रिया करावी व ती कशाप्रकारे करावी?
पाणी नियोजन
✅या बुरशीजन्य रोगांपासून बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी प्राथमिक प्रादुर्भाव रोखण्याबरोबर या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होऊ न देणे तितकेच गरजेचे आहे.त्यासाठी जमीन जास्तीत जास्त ओली न राहता कोरडी व वाफसा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे राहिल याची काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी मातीचा प्रकार, जलसिंचन प्रकार, व वातावरण यानुसार योग्य प्रकारे पाणी नियोजन कसे करणे गरजेचे आहे.कांदा रोपांना पाण्याचे नियोजन कशा प्रकारे करावे याच्या माहितीसाठी खालील लिंक वर किंवा फोटोवर क्लिक करा.
कांदा रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे?
नायट्रोजन युक्त खतांचा मर्यादित वापर
✅रासायनिक खत नियोजन करताना वतावरणानुसार व जमिनीतील अन्नद्रव्यांच्या माहितीनुसार नायट्रोजन युक्त खतांचा वापर संतुलित करावा. नायट्रोजन वापर संतुलित केल्यामुळे रोपांमध्ये IAA व GA या वनस्पती संप्रेरकांचे प्रमाण कमी होते व पीळ रोगाची समस्या येत नाही.
अमिनो युक्त उत्पादनांचा मर्यादित वापर
✅अमिनो युक्त उत्पादनांचा वापर संतुलित करावा. अमिनो युक्त उत्पादनांचा वापर संतुलित केल्यामुळे रोपांमध्ये IAA व GA या वनस्पती संप्रेरकांचे प्रमाण कमी होते व पीळ रोगाची समस्या येत नाही.
प्रतिबंधात्मक फवारणी नियोजन
✅कांदा बियाणे उगवून जमिनीच्या वर आल्यानंतर रोपांना पीळ पडू नये म्हणून त्यावर योग्य प्रकारे फवारणी नियोजन करणे गरजेचे आहे.फवारणी खालील पैकी कोणत्याही एका किटची दाट करावी.
उपचारात्मक/नियंत्रणात्मक उपाययोजना
✅उपचारात्मक उपाययोजना म्हणजे कांदा रोपांवर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण मिळवण्यासाठी करायच्या उपाययोजना होय.
✅कांदा बियाणे उगवून जमिनीच्या वर आल्यानंतर अशा रोपांची मर होत असेल तर फवारणी नियोजन करणे गरजेचे आहे.फवारणी खालील पैकी कोणत्याही एका किटची दाट स्वरूपात करावी.
✅फवारणी करताना फवारणी नौजल मधील रबर काढून दाट फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी शेतास चांगल्या प्रकारे पाणी द्यावे जेणेकरून जमिनीमध्ये असणाऱ्या ओलाव्यामुळे फवारणी द्रावण ची कार्यक्षमता वाढेल व परिणाम कमी कालावधीत चांगले मिळतील.
खालील पैकी एका किटची दाट फवारणी करा.
-
Tata Master Actara RootStar Spray Kit
₹786.00 – ₹1,600.00 Buy Now -
Tata master- Aaatank-MC Extra Spray Kit
Original price was: ₹2,071.00.₹1,698.00Current price is: ₹1,698.00. Buy Now -
Saaf Profex super MC Extra Spray Kit
Original price was: ₹1,777.00.₹1,421.00Current price is: ₹1,421.00. Buy Now -
Saaf - Admire - Root Aster Drenching Kit
₹762.00 – ₹1,600.00 Buy Now -
RidomilGold Marshal GreenBee Spray Kit
Original price was: ₹1,648.00.₹1,253.00Current price is: ₹1,253.00. Buy Now -
Matco Gold Admire RootAster Drenching Kit
₹1,237.00 – ₹2,450.00 Buy Now