कांदा रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे?
कांदा रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे हे खालील मुद्द्यांवर अवलंबून आहे.
✅ जलसिंचन प्रकार
✅ मातीचा प्रकार
✅ वातावरण
जलसिंचन प्रकार
✅कांदा रोपवाटिका ही प्रामुख्याने सारा पद्धत व गादीवाफा पद्धत यामध्ये बनवलेली असते.ज्यात सारा पद्धत असेल तर त्यास सोडपाणी,तुषार सिंचन किंवा पाईपद्वारे पाणी दिले जाते.
✅कांदा मुळे जास्त खोलवर वाढत नाहीत, त्यामुळे सोडपाणी देत असाल तर, जास्त वेगाने पाणी द्यावे. नळीने कमी वेगाने पाणी देऊ नये.जर कमी वेगाने पाणी दिले तर ते जास्त खालीपर्यंत जाते व जास्त काळ जमिनीत ओलावा राहतो व रोपांची मर होते.
मातीचा प्रकार
✅मातीचे त्यांच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेच्या गुणधर्मानुसार तीन प्रकार पडतात.
1) जाड माती – काळी माती, गाळाची माती.
2) मध्यम जाड किंवा मध्यम हलकी – तांबट – काळी निळी
3) हलकी माती- मुरमाड- तांबट मिक्स, वाळूसार मुरमाड माती.
✅जाड जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते. अशी जमीन वाफस्यावर यायला वेळ लागतो.मध्यम हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असते. अशा जमिनी लवकर वाफस्यावर येतात व हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा जमिनी लवकर वाफस्यावर येतात व लवकर कोरड्या होतात.
✅जाड मातीच्या जमिनीमध्ये पाणी देताना जर सोडपाणी देत असाल तर 10 ते 15 दिवसातून एकदा पाणी द्यावे. ज्यामुळे जमीन जास्तीत जास्त दिवस वाफस्यावर राहिल.जर पाणी हे तुषार सिंचन किंवा रेन पाईप ने देत असाल, तर 7 दिवसातून एकदा पाणी द्यावे.अशा प्रकारे जाड जमिनीमध्ये पाण्याचे नियोजन करावे.
✅मध्यम जाड जमिनीमध्ये पाणी देत असताना सोडपाणी देत असाल तर 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी द्यावे. पाणी देताना जमीन जास्तीत जास्त दिवस वाफस्यावर राहील अशा प्रकारे पाण्याचे नियोजन करावे.
✅हलक्या जमिनीमध्ये पाण्याचे नियोजन जर सोडपाणी पद्धतीद्वारे करत असाल तर 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी द्यावे.तर तुषार सिंचन किंवा रेन पाईप द्वारे पाणी देत असाल तर एक ते दोन दिवसाआड पाणी द्यावे.
वातावरण
✅वातावरण हे पावसाळी असेल तर पाणी नियोजन हे करताच येत नाही.
✅ढगाळ किंवा उन्हाळी वातावरण असेल तर मातीचा प्रकार,जलसिंचन प्रकार यानुसार लवकर जास्त काळ राहील अशा प्रकारे पाणी नियोजन करावे.