Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 3.कांदा रोपवाटीकेत येणाऱ्या अडचणी

कांदा बियाणे उगवत असताना अंकुर किंवा रोपे उगवून आल्यानंतर पिवळी पडत आहेत त्यावर काय उपाययोजना कराव्यात?

कांदा बियाणे पेरणीनंतर सात ते आठ दिवसांनी उगवते, काही बियाणे उगवत असताना त्याचे अंकुर पिवळे पडतात तर काही बियाणे उगवून जमिनीच्या वर आल्यानंतर रोपे पिवळी पडायला लागतात याची कारणे ही खालील प्रमाणे आहेत.

नायट्रोजन कमतरता

✅नायट्रोजनची कमतरता असेल तरी कांदा बियाणे उगवत असताना अंकुर पिवळे पडू शकतात, परंतु ही शक्यता खूपच कमी आहे कारण कांदा बियाणे पेरणी ही रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये होत असते या महिन्यांमध्ये हवेमध्ये म्हणजेच वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते, त्यामुळे नायट्रोजनच्या कमतरतेमुळे कांदा रोपांचे अंकुर पिवळे पडणे ही शक्यता खूपच कमी आहे.

पाणी नियोजनातील चूक

✅अधिक किंवा कमी पाणी दिल्यामुळे जमिनीत हवा तेवढा वाफसा राहत नाही व रोपांच्या मुळांना ऑक्सिजन या वायूचा पुरवठा हवा त्या प्रमाणामध्ये होत नाही आणि त्यामुळे निघणारे कोंब हे पिवळे निघत असतात. 

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

✅बियाणे अंकुरित असताना जर पीथीयम, फुजारीयम,कॉलेट्रिशियम या बुरशींचा प्रादुर्भाव बियाण्यावर झाला तर बियाणातून निघणारे अंकुर हे पिवळे निघू शकतात व अशा रोपांची वाढ खुंटते व कालांतराने अशा रोपांची मर होते.

वातावरणाचा ताण

✅खूप उष्णता किंवा जास्त थंड हवामानामुळे कांदा रोपे ताणाखाली येतात, ज्यामुळे रोपे उगवत असताना रोपे पिवळी पडणे ही सगळ्यात मोठी अडचण रोपवाटिकेमध्ये येते.


या अडचणीवर उपाययोजना करताना उपाययोजना या एकात्मिक,प्रतिबंधात्मक व उपचारात्मक करायच्या आहेत.

एकात्मिक उपाययोजना 

✅एकात्मिक उपाययोजना म्हणजे एकत्रितपणे लागवडी अगोदर येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करणे होय.
सर्वप्रथम जमिनीची निवड योग्य प्रकारे करावी,जास्त किंवा कमी पानी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जमीन निवडू नये. जमीन हि मध्यम पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी निवडावी,उदा. तांबट,काळी-तांबट; तसेच जमीन निवडताना अशा जमिनीची निवड करा जेणेकरून पाण्याचा निचरा लवकर होईल व जमीन लवकर वाफस्यावर येईल.अशा जमिनीत पांढऱ्या मुळांची कार्यक्षमता वाढते व अन्नद्रव्ये शोषण वाढते,जमीन निवड योग्य प्रकारे केल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही,नायट्रोजन कमतरता भासत नाही,मुळांची कार्यक्षमता वाढते. व बियाणे उगवत असताना किंवा उगवल्यानंतर पिवळे पडत नाहीत.
कांदा रोपवाटीकेसाठी जमिनीची निवड कशाप्रकारे करावी या विषयावर माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
येथे क्लिक करा.
✅त्याचबरोबर निवड केलेल्या जमिनीची मशागत व्यवस्थित करावी,मशागत व्यवस्थित केल्यामुळे बुरशीचे बिजाणू निष्क्रिय होतात. तसेच जमीनीची मशागत केल्यामुळे जमीन भुसभुशीत होते व पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते ज्यामुळे बियाण्यास ऑक्सीजन पुरवठा होतो तसेच मुळांची कार्यक्षमता वाढते जमीनिमधून अन्नद्रव्य शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळे नायट्रोजनची कमतरता  भासत नाही,यामुळे जमिनीची मशागत योग्य प्रकारे केल्यामुळे रोपे उगवत असताना पिवळी पडत नाहीत.
कांदा रोपवाटीका बनवत असताना जमिनीची मशागत कशी करावी या विषयावर माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
येथे क्लिक करा.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

✅प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे अडचण येण्याअगोदर उपाययोजना करणे होय.
✅रोपे पिवळी हि नायट्रोजन कमतरतेमुळे पडू नयेत म्हणून लागवडीपूर्वी शेताची मशागत करताना योग्य प्रकारे खतांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील खते लागवडिपूर्वी मशागत करताना टाकावीत.
DAP (Diammonium Phosphate )
प्रमाण : 15 किलो 7 ते 10 गुंठे क्षेत्रासाठी
SSP (Single Super Phosphate )
प्रमाण : 20 किलो 7 ते 10 गुंठे क्षेत्रासाठी
K-Mag
प्रमाण : 15 किलो 7 ते 10 गुंठे क्षेत्रासाठी
Zinc Sulphate
प्रमाण : 2 किलो 7 ते 10 गुंठे क्षेत्रासाठी


✅नर्सरी मध्ये पाणी नियोजन करताना मातीचा प्रकार,वातावरण यांसारख्या गोष्टींचा विचार करून योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन करावे जर जमीन हलकी म्हणजेच कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी असेल तर दोन पाण्यामधील अंतर कमी ठेवावे जेणेकरून शेत सतत वाफसा स्थितीत राहील,अशा प्रकारे हलक्या जमिनीमध्ये पाण्याचे नियोजन करावे तसेच जर जमीन जाड असेल म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल तर दोन पाण्यांमधील अंतर जास्त ठेवावे जेणेकरून शेत सतत वाफसा स्थितीत राहील जेणेकरून मुळांची कार्यक्षमता वाढेल व अन्नद्रव्ये शोषण वाढते, व अन्नद्रव्ये पुरवठा व मुळांना ऑक्सिजन पुरवठा होतो परिणामीबी उगवताना अंकुर पिवळे पडणार नाहीत.
कांदा रोपवाटीकेत पाणी नियोजन कसे करावे याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे.
येथे क्लिक करा.

✅नर्सरी मध्ये रोपे पिवळे पडण्याचे एक कारण हे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असते त्यासाठी बी पेरणीपूर्वी जर आपण बियाण्यास बीज प्रक्रिया केली तर ही अडचण येणार नाही.
बीज प्रक्रिया कशासाठी कोणत्या उत्पादनांची व कशी करावी यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
येथे क्लिक करा.

या अडचणी संबंधित व्हिडिओ

कांदा बियाणे उगवत असताना अंकुर किंवा रोपे उगवून आल्यानंतर पिवळी पडत आहेत त्यावर काय उपाययोजना कराव्यात?

✅प्रतिबंधात्मक नियंत्रण: परंतु काही परिस्थितीमध्ये बीज प्रक्रिया केली नसेल तर बियाणे उगवण झाल्यानंतर लगेच खालील पैकी एक फवारणी करावी.म्हणजे रोपे उगवून आल्यानंतर पिवळी पडणार नाही.

✅उपचारात्मक नियंत्रण : कांदा बियाणे उगवून आल्यानंतर रोपे पिवळी पडत असतील तर खालील पैकी एक फवारणी करावी.जेणेकरून रोपे हिरवीगार होतील.