कांदा बी टाकण्याची पद्धत

✅कांदा बी टाकण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारची म्हणजेच गादीवाफा पद्धत किंवा सारा पद्धत यापैकी कोणत्या  प्रकारे रोपवाटिका तयार करत आहात त्यावर ते अवलंबून आहे.

काही प्रमुख पद्धती

✅पेरणी पद्धत
✅फेकून देणे (विस्कटने पद्धत)
✅टोकन पद्धत

पेरणी पद्धत

✅या पद्धतीमध्ये पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली जाते, ज्यामुळे एकसारखे अंतर राखले जाते व योग्य प्रमाणात बियाणे वापरले जाते. ज्यामुळे चांगल्या व दर्जेदार पद्धतीची रोपे तयार होतात.
✅या पद्धतीमध्ये योग्य प्रमाणामध्ये बियाण्याचा वापर केला जातो. ज्यामुळे बियाण्यांचा होणारा आर्थिक खर्चही कमी होतो. ही पद्धत यंत्राद्वारे पूर्ण केली जाते. यानुसार सारा पद्धत आणि गादीवाफा पद्धतीमध्ये सुद्धा पेरणी केली जाते.

फेकून देणे (विस्कटने पद्धत)

✅या पद्धतीमध्ये योग्य प्रकारे बियाणे शेतामध्ये एकसारखे फेकले जाते. ही पद्धत फार पूर्वीपासूनची पद्धत आहे. या पद्धतीद्वारे शेतकरी बियाणे शेतामध्ये फेकतात.
✅या पद्धतीनुसार सारा पद्धत मध्ये कांदा लागवड किंवा रोपवाटिका केली जाते.

टोकन पद्धत

✅या पद्धतीमध्ये गादीवाफ्यावर किंवा सारा पद्धतीमध्ये एक समान अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये बियाणे पातळ हाताने एकसारखे टाकून मातीआड केले जाते.
✅ही पद्धत आधुनिक आहे या पद्धतीद्वारे चांगल्या गुणवत्तेच्या रोपांची निर्मिती केली जाते.