कांदा रोपवाटिकेचे प्रकार
कांदा रोपवाटिका प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते.
✅सारा पद्धत
✅गादीवाफा पद्धत
सारा पद्धत
✅या पद्धतीमध्ये चार फुटी सारे सोडले जातात व त्यामध्ये बियाणे पेरणी केले जाते किंवा टाकले जाते. या पद्धतीमध्ये बियाण्यास पाणी हे सोड पाणी पद्धत, तुषार सिंचन पद्धत याद्वारे दिली जाते. या प्रकारात एक एकर रोपांसाठी जर रोपवाटिका बनवत असाल तर रोपवाटिका ही पाच ते सात गुंठे क्षेत्रामध्ये बनवायला हवी.
गादीवाफा पद्धत
✅या पद्धतीमध्ये साडेचार फुटी गादीवाफे तयार केले जातात व त्या गादीवाफ्यावर रेषा ओढून त्यामध्ये बियाणे टाकून ते मातीआड केले जाते. या पद्धतीमध्ये रोपांना पाणी हे रेन पाईप किंवा तुषार सिंचन पद्धतींमध्ये दिले जाते. या प्रकारात एक एकर रोपांसाठी रोपवाटिका बनवत असाल तर रोपवाटिका ही दहा गुंठे क्षेत्रामध्ये बनवावी.