बुरशीनाशकांचे प्रकार आणि वापरण्याची पद्धत

June 5, 2024

बुरशीनाशक (fungicide) म्हणजे असे रसायन किंवा पदार्थ जे बुरशीचा नाश करतात. किंवा त्यांच्या वाढीला प्रतिबंध करतात. बुरशीनाशकांचा वापर विविध पिकांच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.

बुरशीनाशकांचे प्रकार 

बुरशीनाशक (Contact Fungicides)

  • हे पानांच्या पृष्ठभागावर रहातात आणि बुरशीनच्या संपर्कात येताच त्यांचा नाश करतात.
  • उदा. मॅन्कोझेब,कॉपर,ऑक्सीक्लोराइड.

आंतरप्रवाही बुरशीनाशक (Systemic Fungicide)

  • हे वनस्पतीमध्ये शोषून घेतले जातात. आणि आतील भागात कार्य करतात.
  • उदा. कार्बेन्डाझिम,ट्रायसायक्लाझोल

प्रतिबंधक बुरशीनाशक (Preventive Fungicide)

  • हे बुरशीची लागण होण्यापूर्वी वापरले जातात. आणि त्यांची वाढ रोखतात.
  • उदा. सल्फर, झिंक

उपचारात्मक बुरशीनाशक (curative Fungicide)

  • हे लागण झाल्यानंतर वापरले जातात. आणि बुरशीच्या रोगावर उपचार करतात.
  • उदा. मेथिल,थायोफेनेट,ट्रायडिमेफॉन
बुरशीनाशकांचा वापर

पिकांचे संरक्षणबुरशीनाशकांचा वापर पिकांवर बुरशीजन्य रोग होण्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.

फळे आणि भाजीपाला संरक्षण : फळे आणि भाज्यांवर बुरशी लागल्यास त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

बियाणांचे संरक्षण :बियांणा  बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी त्यांवर बुरशीनाशकांचा लेप लावाला जातो.

बुरशीनाशक वापरण्याची पद्धत  

फवारणी (Spraying): बुरशीनाशक द्रावणाची फवारणी करणे.

बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) : बियांण्यावर बुरशीनाशकांचा लेप लावणे.

माती प्रक्रिया (Soil Treatment) : मातीमध्ये बुरशीनाशक मिसळणे.

वापराची काळजी 

दोषकारक परिणाम : बुरशीनाशकांचा अतिरेकी वापर पर्यावरण मनुष्यांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम करू शकतो.

सुरक्षितता : बुरशीनाशकांचा वापर करताना योग्य साधनांचा वापर करणे, जसे की हातमोजे,मास्क इ.

डोस :प्रत्येक  पिकासाठी आणि रोगासाठी योग्य डोस पाळणे आवश्यक आहे.

बुरशीनाशकांचा योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास पिकांचे संरक्षण आणि उत्पादनवाढीला मदत होते. मात्र त्यांचा अतिरेकी आणि चुकीचा वापर टाळणे आवश्यक आहे.