शास्त्रीय नाव

Thrips tabaci

जीवनचक्र

✅फुलकिड्यांचे जीवनचक्र चार प्रमुख टप्प्यांमध्ये विभागलेले असते:

अंडी अवस्था

  • मादी फुलकिडी पाने, फुले, आणि फळांच्या पेशींमध्ये अंडी घालतात.
  • ही अवस्था साधारणता 2-4 दिवस असते त्यानंतर या अंड्यांमधून लार्वा बाहेर येतो.

लार्वा (निम्फ) अवस्था

  • अंडी फुटल्यानंतर लार्वा बाहेर येतात.
  • हे दोन अवस्थांत विभागले जाते,प्रथम लार्वा (First instar larva) आणि द्वितीय लार्वा (Second instar larva).
  • साधारणत 4-6 दिवसांपर्यंत लार्वा अवस्था चालते.
  • या अवस्थेमध्ये किड पानांवर  रस शोषण करते.

कोष अवस्था

  • लार्वा अवस्था पूर्ण झाल्यानंतर कोष अवस्थेत जातात.
  • या अवस्थेत ते मातीमध्ये किंवा पानांच्या खालच्या बाजूला राहतात.
  • ही अवस्था 2-4 दिवस चालते.

पतंग अवस्था 

  • कोष अवस्थेतून बाहेर आल्यावर प्रौढ फुलकिड्या तयार होतात.
  • फुलकिडे फुलांच्या आणि पानांच्या रसाचे शोषण करतात.
  • प्रौढ फुलकिड्यांचे आयुष्य साधारणतः 15-30 दिवस असते.
  • प्रौढ माद्या अंडी घालून नवीन जीवनचक्राला प्रारंभ करतात.
जीवनचक्र सारांश
  • अंडी अवस्था : 2-4 दिवस
  • लार्वा अवस्था : 4-6 दिवस
  • कोष अवस्था : 2-4 दिवस
  • पतंग अवस्था : 15-30 दिवस
पोषक वातावरण

फुलकिड्यांना पोषक वातावरण असेल तर ते वेगाने वाढतात:

  • तापमान : 20°C ते 30°C तापमान हे फुलकिड्यांच्या वाढीसाठी अनुकूल असते.
  • आर्द्रता : मध्यम ते कमी आर्द्रता हे फुलकिड्यांच्या वाढीसाठी उपयुक्त असते.
  • प्रकाश: प्रखर प्रकाश असलेल्या ठिकाणी फुलकिडे जास्त सक्रीय असतात.
  • पोषण : फुलकिड्या फुलांच्या आणि पानांच्या रसाचे शोषण करतात. त्यामुळे ते जिथे जास्त  प्रमाणात फुले व पानांची संख्या अधिक असते तिथे सहज वाढतात.
किडीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा?

फुलकिडे प्रादुर्भाव ओळखण्यासाठी खालील लक्षणे तपासा:

  • पानांवर चट्टे: पानांच्या वरच्या पृष्ठभागावर पांढरे किंवा पिवळसर चट्टे दिसतात. हे चट्टे फुलकिड्यांच्या रस शोषण्यामुळे निर्माण होतात.
  • पानांचे विकृतीकरण: जास्त रसशोषण केल्यामुळे पाने आकसतात व सुरुकतल्याप्रमाणे होतात.
  • फुलांचे विकृतीकरण: फुलांचे रंग फिके होतात आणि ते पूर्णपणे विकसित होत नाहीत.
  • सुडं: पानांच्या पृष्ठभागावर चमकदार रेषा दिसतात, जे फुलकिड्यांच्या उपस्थितीचे सूचक असू शकतात.
  • फळांचे नुकसान: फळांवर लहान खड्डे आणि चट्टे दिसतात, ज्यामुळे फळे विकृतीकरण होतात.
किडीच्या प्रादुर्भावमुळे काय नुकसान होते?
  • फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो व ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया संथ होतात व रोपांची वाढ थांबते.
  • फुलकिडे पानांच्या पेशीमध्ये अंडी घालतात आणि रस शोषतात, ज्यामुळे पानांवर पांढरे किंवा पिवळसर चट्टे तयार होतात.पानांच्या कडा वाळून जातात आणि पानांचा विकास थांबतो.यामुळे प्रकाशसंश्लेषन  प्रक्रिया चांगल्या प्रकारे होत नाही व रोपांची वाढ खुंटते.
  • फुलांचे रंग फिके होतात आणि ते पूर्णपणे विकसित होत नाहीत.फुलांचा आकार आणि गुणवत्ता कमी होते, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता खालावते.
  • फळांवर लहान खड्डे आणि चट्टे दिसतात.फळांचे विकृतीकरण होते, ज्यामुळे फळे बाजारात विकण्यासाठी योग्य राहत नाहीत.
  • फुलकिडे विषाणू वाहक म्हणून काम करतात आणि विविध विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात. उदा. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस (TSWV).विषाणूजन्य रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते आणि उत्पादन पूर्णतः नष्ट होऊ शकते.
  • फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे आर्थिक नुकसान होते. उत्पादनाची गुणवत्ता खालावल्यामुळे विक्री किंमत कमी होते, तसेच उत्पादनाची संख्याही कमी होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना

 फुलकिड्यांचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करा:

पारंपरिक उपाय:

  • पिकांची फेरपालट: टोमॅटोची लागवड एकाच ठिकाणी सतत न करता फेरपालट करा.
  • निरोगी रोपे लागवड: निरोगी रोपे निवडून त्यांची लागवड करा.
  • आंतरपीक लागवड: आंतरपीक लागवड करून फुलकिड्यांची संख्या कमी करता येते.

यांत्रिक उपाय:

  • पिवळे चिकट सापळे: पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करून प्रौढ फुलकिड्यांना पकडता येते.
  • वायू प्रवाह नियंत्रित करणे: पॉलीहाउस किंवा ग्रीनहाउस मध्ये वायू प्रवाह नियंत्रित करणे.
  • सापळा पिके लागवड: शेताच्या चारही बाजूंनी सापळा पिके लावावीत. उदा.(मका,झेंडू)ज्यामुळे बाहेरून आलेले पतंग शेताच्या बाहेर सापळा पिकांच्या वर प्रथम प्रादुर्भाव करतात, ज्यामुळे त्यावर योग्य वेळी नियंत्रणात्मक उपाययोजना करता येतात.
  • इनसेक्ट नेटचा वापर:शेताच्या चारही बाजूनी इनसेक्ट नेट लावावे जेणेकरून बाहेरून येणारे या किडीचे पतंग शेतामध्ये येणार नाहीत.

जैविक उपाय:

  • जैविक कीटकनाशक: जैविक कीटकनाशकांचा वापर करावा, जसे की Beauveria bassiana किंवा Verticillium lecanii.
  • मित्र किडी वापर: फुलकिड्यांचे प्राकृतिक शत्रू जसे की, लेडीबर्ड बीटल्स किंवा ग्रीन लेसविंग वापरून त्यांचे नियंत्रण करता येते.

 रासायनिक उपाय:

  • कीटकनाशके: नियमानुसार आणि योग्य मात्रेत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा. काही कीटकनाशके जसे की स्पिनोसॅड, इमिडाक्लोप्रिड, किंवा फिप्रोनिल यांचा वापर करता येतो.
  • फवारणी: नियमित फवारणी करून फुलकिड्यांची संख्या कमी करता येते.

नियमित निरीक्षण

  • पिकांचे नियमित निरीक्षण करून फुलकिड्यांची उपस्थिती तपासा.
  • प्रादुर्भाव आढळल्यास तात्काळ उपाययोजना करा.
  • फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून वेळेवर योग्य उपाययोजना केल्याने नुकसान कमी करता येते.