मातीतील अन्नद्रव्ये आणि त्यांची पिकाच्या वाढीत व विकासात असणारी महत्वाची भूमिका.

May 31, 2024

पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी मातीतील प्रमुख (Macro),दुय्यम (Secondary) आणि सूक्ष्म (Micro) अन्नद्रव्ये अत्यंत महत्त्वाची असतात. प्रत्येक अन्नद्रव्याची पिकाच्या वाढीत विशिष्ट भूमिका असते.

प्रमुख/मुख्य अन्नद्रव्ये

1)नायट्रोजन (N)

कार्य

  • वनस्पतींच्या प्रथिनांचे व हरितकणांची निर्मिती करणे.
  • पानांची संख्या व आकार वाढवते.ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वाढते.
  • वनस्पतींमध्ये कार्बोहायड्रेट्स व प्रथिनांचे संतुलन राखते ज्यामुळे वनस्पतींमध्ये विकास होतो.
  • नायट्रोजन वनस्पतींच्या पानांचे हिरवेपण वाढवते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वाढते.
  • अनेक एंजाइम्ससाठी नायट्रोजन आवश्यक आहे, ज्यामुळे वनस्पतींची जैवरासायनिक प्रक्रिया सुलभ होते.

अभावाचे परिणाम:

  • पानांचा रंग फिकट होतो.
  • वनस्पतींची वाढ मंदावते.
  • उत्पादनात घट येते.

2)फॉस्फरस (P)

कार्य:

  • अडेनोसिन ट्रायफॉस्फेट (ATP) च्या निर्मितीत फॉस्फरस महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो ज्याद्वारे प्रकाश संश्लेषण   प्रक्रियेद्वारे तयार झालेल्या ग्लुकोज स्वरूपातील अन्नाचे ऊर्जेत रूपांतर केले जाते.
  • ऊर्जेचे साठवणूक आणि ऊर्जेचे वाहन करण्यात महत्वपूर्ण आहे.ज्यामुळे रोपांच्या वाढीच्या भागांना ऊर्जा पुरवली जाते व रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
  • मुळांच्या शाखिय विकासात महत्वाची भूमिका बजावतो.
  • नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती होते.
  • बियांचे अंकुरण व विकास वाढवतो.

अभावाचे परिणाम:

  • मुळांच्या विकासावर परिणाम होतो.
  • पानांचा रंग गडद हिरवा किंवा जांभळा होतो.
  • फुलांची संख्या कमी होते.

3)पोटॅशियम (K)

कार्य:

  • वनस्पतींच्या रोगप्रतिबंधक क्षमतेत सुधारणा करतो.
  • पाण्याचे संतुलन राखण्यात मदत करतो.ज्यामुळे वनस्पती मधील टर्गर दाब संतुलित राहतो.
  • ही वनस्पतीच्या पर्ण रंद्र उघडझाप प्रभावित करते.
  • फळांचे गुणवत्ता व टिकाऊपणा वाढवतो तसेच फळांची आकार, रंग आणि स्वाद सुधारण्यासाठी पोटॅशियम आवश्यक आहे.
  • एनझाइम्सच्या कार्यात सुधारणा आणतो.ज्यामुळे वनस्पतींची जैवरासायनिक प्रक्रिया सुलभ होते.व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.

अभावाचे परिणाम:

  • पानांच्या काठावर करडे डाग पडतात.
  • वनस्पतींच्या रोगप्रतिकारक क्षमतेत घट होते.
  • फळांचा आकार व गुणवत्ता कमी होते.

दुय्यम अन्नद्रव्ये 

1)कॅल्शियम (Ca)

कार्य:

  • कोशिकांच्या भिंतींचे निर्माण व मजबूतीकरण मधील महत्वाचा घटक आहे ज्यामुळे वनस्पती मध्ये लवचिक पणा येतो.
  • मुळांच्या वाढीसाठी आवश्यक घटक आहे.
  • इतर अन्नद्रव्यांच्या वाहतुकीसाठी मदत करतो.

अभावाचे परिणाम:

  • मुळांची  वाढ मंदावते.
  • नवीन पानांचे टोक करडे किंवा चुरगळलेले होतात.
  • फळांमध्ये काळे डाग पडतात.

2) मॅग्नेशियम (Mg)

कार्य:

  • हरितकणाचे घटक म्हणून कार्य करते.ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेस मदत होते.
  • प्रथिनांची निर्मिती व ऊर्जा वहन करते.ज्यामुळे वाढीच्या भागांना ऊर्जा पुरवठा केला जातो

अभावाचे परिणाम:

  • पानांचा रंग फिकट होतो, (विशेषतः जुनी पाने.)
  • वनस्पतींची वाढ मंदावते.
  • पानांचा काठ पिवळसर होतो.

3) सल्फर (S)

कार्य:

  • अमिनो आम्ले आणि प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक आहे,ज्यामुळे रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
  • ही वनस्पती पानांमधील तेलकटपणा वाढवते ज्यामुळे प्रकाशशोषण चांगल्या प्रकारे होतो व प्रकाशसंश्लेषण  प्रक्रियेचा दर वाढतो.
  • हे फळांमध्ये चकाकी आणते ज्यामुळे फळांची गुणवत्ता वाढते.
  • व्हिटॅमिन्स व एन्झाइम्सच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावते.
  • तेलबियांचे उत्पादन वाढवते.

अभावाचे परिणाम:

  • पानांचा रंग फिकट पिवळा होतो.
  • वनस्पतींची वाढ कमी होते.
  • प्रथिनांची निर्मिती घटते.

सूक्ष्म अन्नद्रव्ये

1)फेरस  (Fe)

कार्य:

  • हरितकणांचे उत्पादन करते.ज्यामुळे प्रकाश प्रक्रिया चांगल्या प्रकारेसंश्लेषण सुधारते.
  • एन्झाइम्सच्या कार्यातील महत्वचा घटक आहे.ज्यामुळे वनस्पती अंतर्गत विविध प्रक्रिया सुधारतात.

अभावाचे परिणाम:

  • पानांचा रंग पिवळसर होतो.
  • फुलांची व फळांची संख्या कमी होते.

2)झिंक (Zn)

कार्य:

  • प्रथिनांची निर्मिती करते.
  • हार्मोन्सच्या कार्यात महत्वाचा घटक आहे
  • याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.
  • याचा वापर केल्यामुळे पाने हिरवीगार होतात व प्रकाश संशलेशन प्रक्रिया चांगल्या प्रकारे सुधारते.
  • याचा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते.

अभावाचे परिणाम:

  • पानांचा आकार कमी होतो.
  • वनस्पतींच्या वाढीमध्ये मंदी .

3)कॉपर  (Cu)

कार्य:

  • हरीतकणांची  निर्मिती करण्यास महत्वाची भूमिका बजावते ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा दर वाढतो.
  • एन्झाइम्सच्या कार्यात सहभागी होतो ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुधारतात.

अभावाचे परिणाम:

  • पानांचा रंग गडद हिरवा किंवा जांभळा होतो.
  • फुलांची संख्या कमी होते.

4)मँगनीज (Mn)-

कार्य:

  • प्रकाशसंश्लेषणात महत्वाची भूमिका बजावते.
  • नायट्रेजनचे रूपांतरण करण्यास महत्वाची भूमिका बजावतो.

अभावाचे परिणाम:

  • पानांचा रंग फिकट हिरवा होतो.
  • वनस्पतींची वाढ मंदावते.

5)बोरॉन (B)

कार्य:

  • कोशिकांच्या विभाजनात मदत करतो
  • फुलांच्या व फळांच्या विकासात महत्वाची भूमिका बाजवतो.

अभावाचे परिणाम:

  • फुलांची व फळांची संख्या कमी होते.
  • मुळांच्या विकासात मंदी.

6)मॉलिब्डेनम (Mo)

कार्य:

  • नायट्रोजनचे रूपांतरण शोषण योग्य स्वरूपात करते ,ज्यामुळे पाने हिरवीगार होतात.
  • एन्झाइम्सच्या कार्यात सहभागी घटक आहे,ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुधारतात.

अभावाचे परिणाम:

  • पानांचा रंग फिकट होतो.
  • वनस्पतींची वाढ मंदावते.

7)क्लोरीन (Cl)

कार्य:

  • क्लोरीन पाण्याचे व्यवस्थापन आणि प्रकाशसंश्लेषण  मध्ये मदत करतो.

अभावाचे परिणाम:

  • क्लोरीन कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात.

पिकांच्या निरोगी वाढीसाठी प्रमुख आणि सूक्ष्म पोषक तत्वे दोन्ही अत्यंत महत्त्वाची आहेत. माती परीक्षण करून पोषक तत्वांची कमतरता शोधाव्या आणि योग्य खतांचा वापर करावा. योग्य पोषण व्यवस्थापनामुळे पिकांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते.