शेड्यूल पीक पद्धती (sequential Cropping )

May 31, 2024
शेड्यूल पीक पद्धतीचे वर्णन
  • शेड्यूल पीक पद्धतीमध्ये एक पिकाच्या काढणीनंतर लगेच दुसरे पीक लावले जाते.
  • यामध्ये विविध पिके लावले जाते.
  • यामध्ये विविध पिके त्यांच्या वाढीच्या कालावधीला आणि आवश्यक वातावरणीय परिस्थितीना अनुसरून नियोजनबद्ध पद्धतीने लावली जातात.
  • या पद्धतीमध्ये पिकांची वेळोवेळी अदलाबदल करून शेतातील उत्प्न्न वाढवले जाते.
शेड्यूल पीक पद्धतीचे फायदे

मातीतील पोषक तत्वांचे संतुलन राखले जाते

  • विविध पिकांच्या बदलामुळे मातीतील पोषक तत्वे विविधरित्या वापरली जातात ,ज्यामुळे एकाच प्रकारच्या पोषक तत्वाची कमतरता टाळता येते.

उत्पन्न वाढते

  • सतत विविध पिके लावल्यामुळे एकूण उत्पन्नात वाढ होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते.

मातीची आरोग्य राखले जाते

  • विविध पिकांमुळे मातीचे जिवाणू अनू सजीव चक्र सक्रिय राहते ,ज्यामुळे मातीचे आरोग्य चांगले राखले जाते.

कीटक व रोगांच्या आक्रमणात कमी

  • एक पिकानंतर लगेच दुसरे पीक लावल्यानंतर कीटक आणि रोगांच्या आक्रमणाची शक्यता कमी होते.कारण विविध पिकांचे विविध कीटक व रोग असतात.
शेड्यूल पीक पद्धतीचे तोटे

वेळेचे योग्य नियोजन आवश्यक

  • शेड्यूल पीक पद्धतीमध्ये प्रत्येक  पिकाच्या वाढीचा काळ आणि हंगामाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • योग्य नियोजन न केल्यास उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

पाण्याची अवश्यकता अधिक

  • या पद्धतीमध्ये पाण्याची अवश्यकता जास्त असते विशेषता ज्या भागात वारंवार पिके घेतली जातात तिथे जलस्त्रोतांची आवश्यकता असते.

मजुरीची गरज अधिक

  • सतत पिकांची अदलाबदल करण्यासाठी मजुरांची अवश्यकता वाढते. त्यामुळे श्रमखर्च वाढू शकतो.

जमिनीची गुणवत्ता कमी होणे

  • एकाच जमिनीत वारंवार पिके  घेण्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होऊ शकते. आणि त्यामधील सेंद्रिय घटकांची कमी होऊ शकते ,ज्यामुळे मातीची गुणवत्ता घटू शकते.

शेड्यूल पद्धती पीक योग्य नियोजन ,पाणी व्यवस्थापन आणि मातीची निगा राखून केल्यास शेतकाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.