जलसिंचन म्हणजे काय..?

May 27, 2024

जलसिंचन म्हणजे पिकांना पाणी देण्याची पद्धत. जलसिंचनाच्या मदतीने शेतात वापरण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. ज्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते, आणि उत्पादनात क्षमता वाढते. जलसिंचनच्या विविध पद्धती आहेत.

जलसिंचनचे प्रकार 

ठिबक सिंचन

  •    सरळ ठिबक सिंचन
  •    सूक्ष्म ठिबक सिंचन

तुषार सिंचन

  •    सरळ तुषार सिंचन
  •    सूक्ष्म तुषार सिंचन

सोड पाणी पद्धत

  •    सरी पद्धत
  •    वाफा पद्धत
 ठिबक सिंचन 

ठिबक सिंचन हि पिकांसाठी पाणीपुरवठ्याचे एक प्रभावी आणि कार्यक्षम पद्धत आहे. या पद्धतीमध्ये पाण्याचे थेंब थेट वनस्पतींच्या मुळांच्यापर्यंत सोडले जातात. यामुळे पाण्याची बचत होते, आणि पिकांना योग्य प्रमाणात पोषण मिळते. ठिबक सिंचनाचे दोन प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे

सूक्ष्म ठिबक सिंचन 

  • या पद्धतीमध्ये पाणी हे थेट रोपांच्या मुळांच्या आसपास च्या भागात ड्रीपरच्या साह्याने सोडले जाते.
  • यामधील दोन Driper मधील अंतर हे 5 फुटांपेक्षा जास्त असते.
  • याचा वापर द्राक्ष,डाळिंब,केळी,पपई,चिकू,आंबा यांसारख्या फळ पिकांमध्ये व Polyhouse Green house व hydroponic मध्ये केला जातो.

सरळ ठिबक सिंचन 

  • सरळ ठिबक सिंचन पद्धतीमध्ये रोपांच्या मुळांच्या कक्षेत ड्रीपरद्वारे पाणी सोडले जाते.
  • यामध्ये दोन ड्रीपरमधील अंतर हे 1फुट,2फुट,1.5फुट असे असते.
  • याचा वापर भाजीपाला (ऊस,आले) व इतर पिकांसाठी केला जातो.

ठिबक सिंचनचे फायदे 

  • ठिबकसिंचन ही थेट रोपांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचवण्याची पद्धत आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व पाण्याची बचत होते. त्यामुळे आपण कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगले उत्पन्न घेऊ शकतो.
  • या सिंचन पद्धतीद्वारे पिकास गरजेनुसार पाणी देता येते. ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • नियंत्रण पद्धतीने पाणी दिल्याने शेतामध्ये येणारे तण कमी प्रमाणामध्ये येते. त्याचबरोबर जमिनीची धूप कमी प्रमाणात होते.
  • थेट मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वाफसा स्थिति राहिल्यामुळे मुळ्यांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते. ज्यामुळे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता येते. ठिबक सिंचन मध्ये विविध प्रकार येतात.
तुषार सिंचन 

तुषार सिंचन पद्धत हि एक प्रभावी व कार्यक्षम पद्धत आहे. जी पाणी वितरण, मातीची गुणवत्ता आणि पिकांची उत्पादन क्षमता वाढवते. हि एक आधुनिक सिंचन पद्धत आहे. ज्यामध्ये पाण्याचे बारीक थेंब पिकावर शिंपडले जातात. हि पद्धत अगदी नैसर्गिक पावसासारखी वाटते. ज्यामध्ये संपूर्ण शेतामध्ये एक समान पाणी वितरण केले जाते. तुषार सिंचन पद्धतीचे 2 प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे.

सरळ तुषार सिंचन

  • सरळ तुषार सिंचन पद्धतीमध्ये स्प्रिंकलर च्या साह्याने संपूर्ण शेतामध्ये पाण्याचे बारीक थेंब पिकावर शिंपडले जातात. हि पद्धत अगदी नैसर्गिक पावसासारखी वाटते. ज्यामध्ये संपूर्ण शेतामध्ये एक समान पाणी वितरण केले जाते.
  • यामध्ये एका स्प्रिंकलर ची पाणी शिंपडण्याची रेंज हि 10 ते 15 मीटर पर्यंत असते.
  • याचा वापर सोयाबीन,घेवडा,ज्वारी,गहु यांसारख्या प्रक्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या पिकावर केला जातो.

सूक्ष्म तुषार सिंचन 

  • सूक्ष्म तुषार सिंचन या पद्धतीमध्ये मायक्रो स्प्रिंकलर किंवा रेन पाईपच्या साह्याने संपूर्ण शेतामध्ये पाण्याचे बारीक थेंब पिकावर शिंपडले जातात. हि पद्धत अगदी नैसर्गिक पावसासारखी वाटते. ज्यामध्ये संपूर्ण शेतामध्ये एक समान पाणी वितरण केले जाते.
  • यामध्ये एका मायक्रो स्प्रिंकलर ची पाणी शिंपडण्याची रेंज हि 25 ते 8 मीटर पर्यंत असते.
  • याचा वापर हा 2.5 फुटापर्यंत वाढणाऱ्या पिकांसाठी केला जातो. (आले,कांदा व इतर)
  • यामध्ये एका रेन पाईपची रेंज हि 3 मीटर ते 4 मीटर पर्यंत असते.
  • याचा वापर भाजीपाला पिकांसाठी व नर्सरी मध्ये केला जातो.

तुषार सिंचनचे फायदे 

  • या सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे पाण्याची बचत होते. व पाण्यात सुद्धा चांगल्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते.
  • या सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे शेतात एक समान पाणी विपरित होते, यामुळे सर्व पिकांना समप्रमाणात पाणी मिळते.
  • या सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे जमिन एकसारखी ओली रहाते. ज्यामुळे जमिनीचा भुसभुशीत पणा वाढतो. ज्यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते. अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे शोषण केले जाते. जमिनीमध्ये जिवाणूनची कार्यक्षमता वाढते व जमिन सुपीक होते.
  • या सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे वातावरणातील तापमान वाढीमुळे रोपांवर आलेला अजैविक ताण कमी होतो. व पानांच्या द्वारे होणारे बाष्पीभवन कमी होते. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
  • या सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे पिकांच्या पानांवर आणि इतर भागांवर पाणी शिंपडले जाते. यामुळे किडी व बुरशीजन्य रोगांचे प्रमाण कमी होते.
  • या सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे मातीची धूप  कमी होते व मातीची रचना टिकून रहाते.
  • या सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे मातीची आद्रता पातळी टिकून रहाते. ज्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
सोड पाणी पद्धत 

सोड पाणी पद्धत हि पिकांसाठी पाणी पुरवठ्याची पद्धत आहे. ज्यामध्ये पाणी प्रवाहाच्या मदतीने दिले जाते या सिंचन पद्धतीचे दोन प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे.

सरी पद्धत 

या पद्धतीमध्ये शेतामध्ये 2.5 ते 5 फुट एवढी सरी सोडली जाते. व या सरीमध्ये किंवा दोन्ही बाजूना पिकांची लागवड केली जाते.  व त्या पाटामध्ये पाणी सोडले जाते. ज्यामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात ओलावा तयार होतो. या पद्धतीचा वापर सर्व पिकांसाठी केला जातो. यामध्ये ऊस हे प्रमुख पिक आहे.

वाफा पद्धत 

  • या पद्धतीमध्ये सरासरी 4 ते 5 फुट एवढ्या आकाराचे वाफे सोडले जातात. या वाफ्यामध्ये पिकाची लागवड मुळांच्या कार्यक्षेत्रात ओलावा तयार होतो.
  • या पद्धतीचा वापर सर्व पिकांसाठी केला जातो. प्रामुख्याने कांदा पिकाची लागवड याच पद्धतीने केली जाते.

फायदे 

  • या पद्धतीमुळे रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात ओलावा तयार होतो. ज्यामुळे रोपांच्या मुळांची कार्यक्षमता वाढते. व अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे शोषण केले जाते.
  • या पद्धतीमुळे जमिनीत ओलावा टिकून रहातो. व जिवाणूनची कार्यक्षमता वाढते, व यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते, व उत्पादनात वाढ होते. कोणत्याही पिकास पाण्याची गरज असते. ज्यामुळे जलसिंचन पद्धत हि पिकाच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाची पद्धत आहे. ज्यामुळे उत्पादनात 20% ते 100% पर्यंत एवढी वाढ होते.