पेरणीपूर्वी बियांणांची निवड कशी करावी.

May 27, 2024

पेरणीपूर्वी बियाणे निवडताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावेत. हे मुद्दे बियाण्यांची गुणवत्ता, स्थानिक हवामान परिस्थिती आणि पिकाच्या विशेष गरजा यांच्यावर आधारित असतात. बियाणे निवड कशी करावी याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

बियाणांची गुणवत्ता 
  • अंकुरण क्षमता – बियाण्यांची अंकुरण क्षमता तपासणे आवश्यक आहे. जास्त अंकुरण क्षमतेची बियाणे निवडण्यासाठी उत्पादन वाढते.
  • प्रमाणित बियाणे – कृषी विभागाने प्रमाणित केलेली बियाणे वापरणे नेहमी फायदेशीर ठरते. कारण त्यांची गुणवत्ता आणि शुद्धता सुनिश्चित केलेली असते.
हवामान आणि माती
  • हवामानानुसार बियाणे – आपल्या क्षेत्रातील हवामान परिस्थितीनुसार बियाणे निवडणे आवश्यक आहे.उदा. काही बियाणे पाण्याच्या परिस्थितीत चांगले वाढतात, तर काही बियाणांना जास्त पाण्याची गरज असते.
  • मातीचा प्रकार – मातीच्या प्रकारानुसार योग्य बियाणे निवडणे गरजेचे आहे.उदा. हलकी माती, भारी माती, किंवा मध्यम माती.
पिकांची गरज 
  • रोगप्रतिकारक क्षमता – ज्या बियाणांना विविध रोगाने किटकांपासून संरक्षण मिळालेले असते, ती बियाणे निवडावीत. यामुळे उत्पादनात वाढ होते, आणि नुकसान कमी होते.
  • उत्पादन क्षमता – उच्च उत्पादन क्षमतेची बियाणे निवडावीत. त्यामुळे आर्थिक लाभ वाढू शकतो.
बाजारपेठेची मागणी
  • ज्या पिकांची बाजारपेठेत जास्त मागणी आहे, त्या पिकांची बियाणे निवडावीत. यामुळे उत्पन्न चांगले मिळू शकते.
पूर्ण पिकांचे विचार 
  • मागील हंगामातील पिकांचा प्रभाव लक्षात घेऊन बियाणे निवडावीत.
  • उदा. मागील हंगामात तृणधान्ये घेतली असल्यास पुढील हंगामात दलहली पिके घेणे चांगले ठरते.
उपलब्ध संसाधने 
  • पाणी, खत आणि मजूर यांची उपलब्धता लक्षात घेऊन बियाणे निवडावीत. कमी संसाधनात चांगले उत्पादन देणारी बियाणे निवडणे फायद्याचे ठरते.
  • वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून बियाणे निवडल्यानंतर त्यांचे उत्पादन वाढता येईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल.
पेरणीपूर्व बीजप्रक्रिया कशी करावी..?

पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे पिकांची वाढ सुधारते. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, आणि उत्पादन वाढते. खालील प्रमाणे बीजप्रक्रिया कशी करावी आणि त्यांचे फायदे आहेत:

रासायनिक प्रक्रिया 

  • बियाणे 2-3 तास 1% पोटॅशियम पमॅग्नेट (KMn04)
  • द्रावणात भिजवावे आणि नंतर वाळवावे.
  • कापूस बियाण्यांसाठी थायरम (Thirum) किंवा कॅप्टन (Captan) सारख्या उत्पादनांचा वापर करावा.

जैविक प्रक्रिया 

  • बीजप्रक्रिया जैविक उत्पादनांचा वापर करून करता येते.
  • उदा. ट्रायकोडर्मा (Trichoderma) व बॅसिलस सबटिलिस (Bacillus subtilis)

बायोफर्टीलायझर्स 

  • बियाणांवर रायझोबियम (Rhizobium) अझोटोबॅक्टर (Azotobacter) फॉस्फोबॅक्टर (Phosphobacter) सारख्या बायोफर्टीलायझर्सचा वापर करावा.
बीजप्रक्रिया करण्याचे फायदे: 

रोग आणि किडींपासून संरक्षण 

  • बीजप्रक्रिया केल्याने बियाणांना विविध रोग आणि किडींपासून संरक्षण मिळते. त्यामुळे पिकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

अंकुरण क्षमता वाढते 

  • बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांची अंकुरण क्षमता वाढते. आणि बियाण्यांची अंकुरण दर सुधारतो.

 उत्पादनात वाढ 

  • बीजप्रक्रियेमुळे पिकांची वाढ सुधारते आणि उत्पादनात वाढ होते.

मातीतील पोषक घटकांचा वापर सुधारतो.

  • जैविक उत्पादनांचा वापर केल्याने मातीतील पोषक घटकांचा प्रभावी वापर होतो.

पर्यावरणास सुरक्षित 

  • जैविक बीजप्रक्रिया पर्यावरणास सुरक्षित असते. आणि मातीची गुणवत्ता कायम ठेवते.

खर्च कमी होतो 

  • बीजप्रक्रियेमुळे रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर कमी होतो. ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
  • वरील पद्धतींचा वापर करून बीजप्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन वाढवण्यात आणि उत्पादन खर्च कमी करण्यात मदत होईल.