बाष्पोत्सर्जनचे महत्त्व

May 27, 2024
बाष्पोत्सर्जनचे महत्त्व

तापमान नियंत्रित करणे 

  • बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पतींचे पानांमधून पाणी वाफेच्या बाहेर पडते. ज्यामुळे पानांचे तापमान कमी होते. यामुळे वनस्पतींना उष्णतेपासून संरक्षण मिळते.

पोषक तत्त्वांचे वहन 

  • बाष्पोत्सर्जनामुळे मुळांमधून पाणी आणि त्यात विरघळलेले खनिजे पानांपर्यंत पोहोचतात. यामुळे वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

जल चक्रात योगदान 

  • बाष्पोत्सर्जनामुळे वातावरणात पाणी आणि वाफेच्या रूपात जाते, ज्यामुळे जलचक्राची सततता खाली जाते. हे वातावरणातील आद्रतेचे संतुलन राखते.

टर्गर दाब (Turgor Pressure) राखणे 

  • बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पतींच्या पेशीचा टर्गर दाब कायम राहतो, ज्यामुळे वनस्पती ताठ राहतात, आणि त्यांचे आकार व बांधणी योग्य राहते.

 वायु बदल 

  • बाष्पोत्सर्जनामुळे  पर्णरंद्र(Stomata) खुले राहतात, ज्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड चा  प्रवेश होतो. आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. ही प्रक्रिया प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे.

ताण सहनशक्ती 

  • बाष्पोत्सर्जनामुळे मुळांद्वारे अधिक पाण्याचे शोषण होते. ज्यामुळे वनस्पतींची जलसंवर्धन क्षमता वाढते, आणि ती ताण सहन करू शकते.
  • बाष्पोत्सर्जन प्रक्रिया वनस्पतींच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी आणि सामान्य कार्यासाठी आवश्यक आहे. ही प्रक्रिया वनस्पतींना तापमान नियंत्रित ठेवण्यास पोषक तत्त्वांचा वहन करण्यास आणि ताण सहन करण्यास मदत करते. बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पतींचे आरोग्य आणि विकास सुचित होतो.
वनस्पतीतील बाष्पोत्सर्जन प्रक्रिया (Transpiration process) 
  • वनस्पतींच्या बाष्पोत्सर्जन प्रक्रिया वनस्पतीमध्ये पाण्याची बाष्परूपात उत्सर्जन होण्याची प्रक्रिया आहे. बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पतींच्या पाण्याचे शोषण, पोषक तत्त्वांचे वहन आणि तापमान नियंत्रणयात मदत होते.

पाणी शोषण (water absorption)

  • मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषण – वनस्पतींच्या मुळांच्या केसाळ भागांव्दारे मातीतील पाणी आणि खनिजे शोषली जातात.मातीतील पाणी  खनिजे शोषून घेतले जाते.
  • झायलमद्वारे वाहतूक – एकदा पाणी शोषले गेले की ते झायलम पेशी मधून वनस्पतींच्या वरच्या भागांपर्यंत, म्हणजे खोड, फांद्या आणि पानांपर्यंत वाहून नेले जाते.

पाणी वाहन (water Transport)

  • पाण्याची वाहतूक – झायलम पेशींमधून पाणी मुळांपासून खोड, फांद्या आणि पानांपर्यंत वाहून नेले जाते. ही प्रक्रिया मुख्यतः दोन तत्त्वांवर आधारित आहे.
  • कॅपिलरी क्रिया (Capillary Action) – झायलम पेशींच्या अरुंद नळीकाकार रचनेमुळे पाणी वर खेचले जाते.
  • सॅकशन बल – (Suction Force) – पानांमधून बाष्पोत्सर्जनाच्या प्रक्रियेमुळे निर्माण होणारा सॅकशन ऊर्जा (Capillary Action) पाणी वर खेचतो.
पानांमधून बाष्पोत्सर्जन (Transpiration From leaves)  

पर्णरंद्र बाष्पीभवन

  • पानांच्या तळाशी असलेल्या पर्णरंद्र (Stomata) नावाच्या सूक्ष्म छिद्रांद्वारे पाण्याचे बाष्पीभवन होते. पर्णरंद्र हे मुख्यत्वे पानांच्या खालील पृष्ठभागावर आढळतात.

संरक्षण पेशींचे कार्य

  •  पर्णरंद्र संरक्षण पेशींच्या (Guard Cells) च्या मदतीने उघडतात. आणि बंद होतात. जेव्हा संरक्षक पेशी पाण्याने पूर्ण होतात तेव्हा पर्णरंद्र उघडतात आणि पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणात सोडले जाते. संरक्षण पेशींच्या पाण्याची कमतरता असल्यास  पर्णरंद्र  बंद करतात, ज्यामुळे पाण्याचे नुकसान कमी होते.