टोमॅटो पिकात बोरॉन अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते..?
लक्षणे
- रोपांची नवीन पाने गोळा होतात.
- टोमॅटोच्या फळांवर काळे किंवा गडद रंगाचे डाग पडतात.
- रोपांची फळे आणि फुले गळून पडतात.
- रोपांची वाढ खुंटते आणि नवीन वाढ नाजूक असते.
- रोपांच्या पानांच्या कडा कोरड्या पडतात आणि गोळा होतात.
कारणे
- काही जमिनीत नैसर्गिकरित्या बोरॉनचे प्रमाण हे कमी असते.
- पाण्याची कमतरता असल्यास बोरॉनचे शोषण कमी होते.
- जास्त प्रमाणात पाऊस पडल्यावर जमिनी मधील बोरॉन शेताच्या बाहेर वाहून नेले जाते.
- जास्त PH असलेल्या जमिनी बोरॉनची उपलब्धता कमी असते.
- जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यास बोरॉनची कमतरता भासते.
नुकसान
- पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही कमी होते.
- फळांचे लहान होतात, आणि रंग ही नीट विकसित होत नाही.
- झाडांची सामान्य वाढ आणि विकास मंदावतो.
उपाययोजना
- बोरॉनयुक्त खतांचा जसे की बोरोक्स (Borox) किंवा सोल्यूबल बोरॉन फर्टिलायझर्स योग्य प्रमाणात वापर करावा. जमिनीचे नियमित परीक्षण करून बोरॉनची उपलब्धता तपासावी.
- योग्य प्रकारे पाण्याचा वापर करून जमिनीतील ओलावा कायम ठेवावा.
- जमिनीचा PH हा 6.5-7.5 च्या दरम्यान ठेवणे गरजेचे आहे.
- सेंद्रिय पदार्थांचा संतुलित वापर करावा, ज्यामुळे बोरॉनची उपलब्धता कमी होत नाही.
हे सर्व उपाययोजना करून टोमॅटो पिकामध्ये बोरॉनच्या कमतरतेची समस्या सोडवता येते आणि पिकांची गुणवत्ता उत्पादन वाढवता येईल.