Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकात कॉपर (तांबे) या अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते..?

लक्षणे 
  • कॉपरची कमतरता असल्यास पानांच्या शिरा आणि कडा पिवळसर होतात.
  • नवीन पानांची वाढ खुंटते आणि ती लहान व विकृत होतात.
  • रोपांवर फुलांची संख्या कमी होते, आणि फळांची गुणवत्ता खालावते.
  • झाडांची एकूण वाढ खुंटते, आणि नवीन वाढ खूपच कमी होते.
कारणे 
  • जास्त PH असलेल्या मातीत कॉपरचे शोषण कमी होते.
  • मातीमध्ये जास्त प्रमाणात फॉस्फरस असणे हे कॉपरचे शोषण कमी करते.
  • अधिक पावसामुळे कॉपर शेताच्या बाहेर वाहून नेला जातो. ज्यामुळे कॉपरची कमतरता निर्माण होते.
  • जास्त सेंद्रिय पदार्थ असलेल्या मातीत कॉपरची उपलब्धता कमी असते.
नुकसान 
  • पिकाचे उत्पादन कमी होते.
  • फळांचा आकार, आणि चव बिघडते.
  • झाडांची एकूण वाढ खुंटते, ज्यामुळे झाडे ही कमजोर होतात.
उपाययोजना 
  • कॉपर सल्फेट किंवा इतर कॉपर युक्त खतांचा वापर करावा.
  • जमिनीत फॉस्फरसचे प्रमाण संतुलित करावे.
  • माती परीक्षण करून त्यातील कॉपरचे प्रमाण तपासावे.
  •  माती परीक्षणाच्या आधारे योग्य खतांचा वापर करावा.
  • कॉपरयुक्त उत्पादनांचा फवारणीद्वारे वापर करावा, ज्यामुळे कॉपरची त्वरित उपलब्धता होते.
  • सेंद्रिय पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

टोमॅटो पिकात कॉपरची कमतरता टाळण्यासाठी वरील उपाययोजना करणे गरजेचे आहे. योग्य व्यवस्थापनामुळे पिकांचे आरोग्य व उत्पादन दोन्ही सुधारते .