Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकात कॅल्शियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे कारणे नुकसान आणि उपाययोजना.

लक्षणे 
  • टोमॅटो फळांच्या तळ भागावर काळा किंवा तपकिरी रंगाचा भाग दिसतो, त्याला ब्लॉसयम एंड रॉट असे म्हणतात.
  • रोपांच्या पानांवर पिवळे चटृटे दिसतात, आणि पाने सुकल्यासरखी होतात.
  • जुन्या पानांच्या वाट्या होतात, आणि पानांच्या कडा तपकिरी रंगाच्या होतात.
  • रोपांवर नवीन वाढ खुंटते. आणि कोवळ्या पानांची वाढ थांबते.
कारणे 
  • मातीमध्ये नेसर्गिकरित्या कॅल्शियम कमी असल्यामुळे कॅल्शियम ची कमतरता जाणवते.
  • कमी किंवा जास्त प्रमाणात पाणी दिले तर कॅल्शियमची उपलब्धता कमी होते.
  • PH कमी असलेल्या मातीमध्ये कॅल्शियमची उपलब्धता कमी असते.
  • नत्र युक्त खते जास्त प्रमाणात वापरल्यामुळे कॅल्शियम शोषणावर विपरित परिणाम होतो, ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता भासते.
नुकसान 
  • ब्लॉसम एंड रॉटमुळे फळांची गुणवत्ता कमी होते, आणि फळे विक्रीयोग्य राहत नाहीत.
  • खराब झालेली फळे विक्रीसाठी घेतली जात नाहीत. त्यामुळे उत्पन्न कमी होते.
  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रोपांची एकूण वाढ आणि विकास खुंटतो.
उपाययोजना 
  • कॅल्शियम युक्त खतांचा वापर करावा. उदा. कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट.
  • रोपांच्या पानांवर फोलियर स्प्रे (जसे की कॅल्शियम क्लोराइड) ची फवारणी करावी.
  • पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. पिकांच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
  • मातीचे माती परीक्षण करून घ्यावे.
  • जर माती अम्लीय असेल तर चुनखडी किंवा डोलोमाइट वापरुन मातीचा PH संतुलित करावा.
  • नत्र युक्त खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा, त्यामुळे कॅल्शियमचे शोषण योग्य प्रकारे होईल.