Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकात फॉस्फरस कमतरतेची लक्षणे काय आहेत ? नुकसान काय होते व उपाययोजना काय कराव्यात.

लक्षणे
  • फॉस्फरस कमतरतेमुळे पानांचा रंग हा गडद हिरवा किंवा निळसर हिरवा होतो. पानांच्या कडा जांभळ्या रंगाच्या होतात, रोपांची वाढ थांबते. रोपांची वाढ सरळ होते, दोन फांद्या मधील अंतर जास्त होते, फुलांची संख्या कमी होते  व फुलांचा आकार लहान होतो. रोपांच्या  मुळांची वाढ थांबते आणि मुळांचा विकास कमी होतो.
कारणे 
  • ज्या जमिनीचा PH जास्त किंवा कमी असतो अशा जमिनीत मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्य कमतरता जाणवते.
  • ज्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असते अशा मातीमध्ये फॉस्फरसची कमतरता जाणवते.
  • टोमॅटो रोपांच्या मुळांचा विकास जर  झाला नाही तर अन्नद्रव्य शोषण होत नाही, व फॉस्फरस कमतरता जाणवते.
  • ज्या जमिनीमध्ये फॉस्फरस कमतरता अगोदर पासून आहे, अशा जमिनीत रोप लागवडीनंतर लगेच फॉस्फरस नंतर त्याची लक्षणे दिसतात.
  • जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतामधील अन्नद्रव्य  शेताच्या बाहेर वाहून जातील व ज्यामुळे फॉस्फरस कमतरता जाणवेल.
  • ज्या जमिनीमध्ये  फेरसचे प्रमाण  जास्त  असते त्या जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता जाणवते.
नुकसान
  • फॉस्फरस हे पेशी निर्मिती व पेशी विभाजन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ज्यामुळे  शाखीय वाढ होत नाही व रोपांची वाढ खुंटते.
  • फॉस्फरस हे वनस्पतीमध्ये ऊर्जा वहन व  ऊर्जा निर्मिती  मध्ये महत्त्वाची भूमिका बजावते  परिणामी  ऊर्जा  वहन व  ऊर्जा  निर्मिती कमी झाल्यामुळे रोपांची नवीन भागांची वाढ थांबते.
  • फॉस्फरस कमतरतेमुळे नवीन फुलांची निर्मिती कमी होते.  फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
 उपाययोजना
  • मातीचे नियमित परीक्षण करून मातीतील फॉस्फरस चे प्रमाण जाणून घ्यावे आणि त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.
  • शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर करावा, त्यामुळे जमिनीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढले.
  • योग्य प्रमाणात फॉस्फरस युक्त खते वापरावीत.
  • टोमॅटो पिकानंतर फॉस्फरसची गरज कमी असलेल्या पिकांची लागवड करावी.
  • मायकोरायझाचा वापर करावा हे जमिनीमधून फॉस्फरस शोषण करण्याची क्षमता वाढवतात.
  • अधिक व मुसळधार पाऊस झाल्यावर शेतामधून अन्नद्रव्य बाहेर वाहून जातात त्यामुळे पाऊस पडून गेल्यानंतर फॉस्फरस युक्त खतांची फवारणी करावी.
  • नायट्रोजनचा वापर मर्यादित करावा. नायट्रोजनचे प्रमाण वाढल्यास फॉस्फरसची कमतरता निर्माण होते.