Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकात (Iron)  लोह या अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते.

लक्षणे
  • नवीन पानांच्या शिरांमध्ये पिवळेपणा दिसतो, तर शिरा हिरव्या राहतात. ही  लक्षणे सर्वात जास्त वरच्या पानांमध्ये दिसतात.
  • नवीन वाढ खुंटते आणि झाडांची एकूणच वाढ मर्यादित राहते.
  • लोहाच्या कमतरतेमुळे फुलांची संख्या कमी होते आणि त्यामुळे फळधारणा कमी होते.
कारणे
  • जास्त PH असलेल्या जमिनीत लोहाची उपलब्धता कमी असते.
  • जास्त पाणी दिल्याने लोहाचे शोषण कमी होते.
  • तसेच जास्त फॉस्फेट असलेल्या मातीमध्ये लोहाचे शोषण कमी होते.
नुकसान 
  • पानांचा पिवळेपणा व झाडाची कमी वाढ यामुळे उत्पादनात घट होते.
  • लोहाच्या कमतरतेमुळे फळांची गुणवत्ता कमी होते.
  • शेवटी एकुण उत्पादन कमी येते.
उपाययोजना 
  • लोहमिश्रित खतांचा वापर करून लोहाची कमतरता दूर करता येते.
  • फॉलेट्स (Fe-EDTA,Fe -DTPA युक्त उत्पादनांचा फवारणी द्वारे केल्यामुळे लोहाची उपलब्धता वाढते.