Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकात येणाऱ्या किडी

टोमॅटो हॉर्नवॉर्म (Tomato Hornworms)

शास्त्रीय नाव

Manduca quinquemaculta

किडीचे जीवनचक्र 

या किडींचे संपूर्ण जीवनचक्र अंडी–अळी-कोष–पतंग या चार भागात विभागलेले असते.

अंडी अवस्था 

  • प्रौढ पतंग टोमॅटो रोपांच्या पानांच्या खालच्या बाजूस गोलाकार आकाराची व फिकट हिरव्या रंगाची अंडी घालतात.
  • अंडी घातल्यावर 4 ते 5 तासांनी ती उबतात व त्यातून अळी बाहेर येते.पर्यावरणीय परिस्थितीनुसार हा कालावधी कमी जास्त असतो.

अळी अवस्था 

  • नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या आकाराने लहान व हिरव्या रंगाच्या असतात.
  • त्या पानांवर आपला आहार घेतात तसतसे ते वेगाने वाढतात, तसतसा त्यांच्या पाठीवर पांढऱ्या रेषा दिसायला लागतात.
  • अळी अवस्था ही 3 ते 4 आठवडे असते. या दरम्यान तिचा आकार 3 ते 4 इंच लांब होतो. पूर्ण विकसित झालेल्या अळ्या या कोषात जातात.

कोष अवस्था 

  • पूर्ण विकसित झालेल्या अळ्या या कोषात जातात.
  • कोष हे जमिनीत वनस्पतींच्या अवशेषात रहातात.
  • कोष अवस्था ही 2 ते 3 आठवडे एवढी असते.
  • त्याचा आकार हा स्पिंडल असतो व रंग हा तपकिरी असतो.
  • ही अवस्था 2 ते 3 आठवडे असते, परंतु काही परिस्थितीमध्ये ते वसंत ऋतु पर्यंत सुप्त अवस्थेत राहतात.

पतंग अवस्था 

  • कोष अवस्था पूर्ण झाल्यानंतर कोषातून पतंग बाहेर येतो.
  • हे पतंग आकाराने मोठे असतात. त्यांचे पंख 4 ते 5 इंच एवढे असतात.
  • पतंग हे निशाचर असतात व प्रकाशाकडे आकर्षित होतात. ते संध्याकाळी व रात्री सक्रिय असतात.
  • हि अवस्था 2 आठवडे इतक्या वेळ असते. या किडीचे संपूर्ण जीवनचक्र 30 ते 50 दिवसांत पूर्ण होते.
  • तापमान जास्त असेल तेव्हा या कीडींची वर्षभरात 6 ते 7 जीवनचक्र पूर्ण होतात व तापमान कमी असेल तर या किडीचे 2 ते 3 जीवनचक्र पूर्ण होते.
प्रादुर्भाव कसा ओळखावा 
  • या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने रोपांच्या पानांवर होतो. त्यामुळे शेतामध्ये पाने कुरतडलेली दिसतायत का ते पहावे.
  • प्रामुख्याने प्रादुर्भाव शेंडयाच्या रोपांच्या कोवळ्या पानांवर होतो, तर पूर्ण विकसित झालेली अळी फळांचे सुद्धा नुकसान करते.ज्यामध्ये फळांना छिद्र पडलेत का ते पहावे.
नुकसान काय करते 
  • ही  अळी पाने खाते त्यामुळे पानांमधील वाहिन्यांचे नुकसान होते व अन्नपूरवठा विस्कळीत होतो. परिणामी रोपांची वाढ खुंटते. तसेच पानांचे नुकसान झाल्यामुळे रोपांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुद्धा विस्कळीत होते.ज्यामुळे रोपांची वाढ व विकास होत नाही.
  • पूर्ण विकसित झालेल्या अळ्या फळांवर सुद्धा खाणे सुरू करतात.ज्यामुळे फळांचे सुद्धा नुकसान होते.
  • रोपांना, पानांना व फळांना जखमा झाल्यामुळे त्यातून बूरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
  • किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो व ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते. या सर्वांचा परिणाम थेट उत्पन्नावर होतो व उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • शेताची नांगरणी करताना खोलवर नांगरणी करावी व 20 ते 25 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. जेणेकरून किडीचे कोष निष्क्रिय होतील.
  • या किडीचे पतंग हे निशाचर असतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकाश सापळे शेतामध्ये लावावेत.
  • शेताच्या चारही बाजूनी सापळा पिके  (मका,झेंडू) लावावीत. ज्यामुळे प्राथमिक टप्यात किडीचा प्रादुर्भाव ओळखता येतो.
  • एकाच शेतात Solanaceae कुटुंबातील पिकाची लागवड एका पाठोपाठ घेणे टाळावे. जेणेकरून मागील पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • प्राथमिक प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नीम ऑइल या सेंद्रिय किटकनाशकांची फवारणी घ्यावी.
  • एकाच प्रकारच्या किटकनाशकांचा वापर वारंवार करू नये. एकाच प्रकारच्या किटकनाशकांचा वापर वारंवार केल्यास किडीची प्रतिकारशक्ती वाढते व लवकर नियंत्रण मिळत नाही.
  • प्राथमिक टप्यात अळीचा प्रादुर्भाव ओळखून योग्य किटकनाशकांचा वापर करावा.
नियंत्रणात्मक उपाययोजना