Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकात येणाऱ्या किडी

 पांढरी माशी (White Fly)

शास्त्रीय नाव 

 Bemisia tabaci

किडींचे जीवनचक्र 

✅पांढरी माशी, ज्याला हिंदीत “सफेद मक्खी” किंवा मराठीत “पांढरी माशी” म्हणतात, टोमॅटो पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहचवते. त्यांचे जीवनचक्र अंडी-निम्फ-कोष-पतंग असे 4  टप्प्यांमध्ये विभागले जाते.त्यांच्या जीवनचक्र माहिती खालील प्रमाणे,

अंडी अवस्था (Egg Stage)

  • मादी पतंग मिलन झाल्यानंतर पानांच्या खालच्या बाजूवर अंडी घालते,एक मादी तिच्या संपूर्ण आयुष्यात शेकडो अंडी घालते.
  • हि अंडी लहान आकाराची, पिवळसर रंगाची असतात.
  • अंडी सुमारे ५-७ दिवसांत उबवतात व त्यातून पिल्ले बाहेर येतात. ही प्रक्रिया तापमान आणि आर्द्रतेवर अवलंबून असते.

निम्फ किंवा पिल्ले अवस्था (Nymph Stage)

  • ही अवस्था 4 भागांमध्ये विभागलेली असते.
  • पहिली अवस्था (Crawler) : अंड्यातून बाहेर पडलेले लहान निम्फ,ज्यांना “क्रॉलर” म्हणतात, थोडं अंतर चालतात आणि कोवळ्या लुसलुशीत पानांवर रसशोषण करतात.ही अवस्था सुमारे २-३ दिवसांची असते.हे निम्फ पानांमध्ये सोंड घालून रस शोषण करतात.
  • दुसरी ते चौथी अवस्था (Settled Nymphs) : पहिल्या अवस्थेनंतर निम्फ एकाच ठिकाणी स्थिर होतात आणि पानांच्या पृष्ठभागावर चिपकून राहतात. हे निम्फ सपाट आणि पारदर्शक असतात, ज्यामुळे त्यांना पाहणे कठीण असते.या अवस्थेत ते सतत पानांचा रस शोषून घेतात.दुसऱ्या ते चौथ्या अवस्थेचा एकूण कालावधी सुमारे ६-१० दिवसांचा असतो.

कोष अवस्था (Pupal Stage)

  • चौथ्या अवस्थेतील निम्फ (ज्याला “रेड-आय” निम्फ म्हणतात) प्यूपा बनतात.
  • ही अवस्था सुमारे ६-७ दिवसांची असते.
  • कोष अवस्था पूर्ण झाल्यानंतर कोषमधुन प्रौढ पांढरी पतंग बाहेर येतात, ज्यामुळे रिकामे कवच मागे राहते.

पतंग अवस्था (Adult Stage)

  • प्रौढ पांढऱ्या माश्या बाहेर आल्यावर लगेच मीलन करतात.
  • मादी काही दिवसांत अंडी घालण्यास सुरुवात करतात.
  • प्रौढ पतंग पानांच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात.
  • पतंग अवस्था हि 1 ते 2 आठवडे चालते एवढ्या दिवसांत मादी पतंग शेकडो अंडी घालते.
जीवनचक्राचा कालावधी
  • संपूर्ण जीवनचक्र सुमारे ३-४ आठवड्यांत पूर्ण होते.
  • अनुकूल परिस्थितीत एका हंगामात अनेक पिढ्या तयार होऊ शकतात.
  • संपूर्ण वर्ष भरामध्ये 10 ते 12 पिढ्यांचे जीवनचक्र पूर्ण होते.
पोषक वातावरण 
  • पांढरी माशी या कीडीच्या विकासासाठी व प्रजननासाठी पोषक वातावरणाची माहिती.
  • जेव्हा तापमान हे 20°C ते 30°C च्या दरम्यान असते व आद्रता मध्यम ते उच्च असते, तेव्हा या किडीचा प्रादुर्भाव विकास व प्रजनन जलद गतीने होते.
  • जेव्हा दिवस मोठा असतो व रात्र लहान असते, तेव्हा या कीडींच्या पतंगाची कार्यक्षमता व प्रजननक्षमता वाढते व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
  • मध्यम व कमी पाऊसामुळे आद्रता मध्यम रहाते.ज्यामुळे या कीडींचा प्रादुर्भाव अधिकच वाढतो. परंतु त्याउलट जर मुसळधार पाऊस आला तर कीडींचे  निम्फ व कोष शेताच्या बाहेर वाहून जातात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • ढगाळ वातावरणात तापमान व आद्रता वाढते. ज्यामुळे या कीडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • एकंदरीत तापमान वाढलेल्या व आद्रता वाढल्यामुळे किडीची जीवनचक्र कमी कालावधीमध्ये पूर्ण होते व कीडींचा प्रादुर्भाव वाढतो.
प्रादुर्भाव कसा ओळखावा 
  • या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ही मुख्यत्वे पानांवर दिसायला सुरुवात होतात. यामध्ये जास्त प्रमाणामध्ये रसशोषण केल्यामुळे पाने पिवळी पडतात.
  • पानांवर ठिपके दिसतात.
  • अशी पाने उलटी करून बघितल्यास त्यांच्या खालील बाजूवर पांढरी माशी दिसते.
  • प्रादुर्भाव वाढल्यानंतर पानांच्या वाट्या होतात.
  • जेव्हा आपण रोप हलवतो तेव्हा पतंग उडलेले दिसतात.
  • प्रादुर्भावीत पान उलटे करून बारीक निरीक्षण केल्यावर तिथे लहान आकाराचे निम्फ दिसतात.
काय नुकसान करते 
  • पानांवर रसशोषण केल्यामुळे पानांमधील हरित कणांचे प्रमाण कमी होऊन पाने पिवळी पडतात. ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेची गती थांबते व त्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
  • पानांवर मोठ्या प्रमाणात रसशोषण केल्यामुळे रोपांची प्रतिकारशक्ती कमी होते. ज्यामुळे रोपे इतर बुरशीजन्य रोगांना लगेच बळी पडतात.
  • पांढरी माशी या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांच्या वाट्या होतात. परिणामी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पूर्णपणे थांबते व रोपांची वाढ खुंटून रोपांची मर होते.
  • पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पानांवर काळ्या रंगाचा चिकट थर येतो. ज्यामुळे इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • पांढरी माशी या कीडींचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रोपांवर अजैविक असा ताण येतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया थांबतात व रोपांची वाढ थांबते.
  • पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे TLCV व TMV या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी निळ्या -पिवळ्या रंगाचे चिकट सापळे शेतामध्ये लावा. ज्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ओळखून वेळेत उपाययोजना करता येतील.
  • शेताच्या चारही बाजूनी सापळा पिके  (मका,झेंडू) यांची लागवड करावी व चारही बाजूनी इनसेक्ट नेट लावावे. जेणेकरून बाहेरून येणारे पतंग आतमध्ये प्रवेश करणार नाहीत.
  • फवारणी करताना इनसेक्ट नेट व सापळा पिकांवर फवारणी करावी जेणेकरून त्यात अडकलेल्या कीडींच्या पतंगांवर नियंत्रण मिळेल.
  • मित्र किडी शेतामध्ये सोडाव्यात (एकसिरिया फार्मोसा व इरेटमोसेरस एरेमिकज) जेणेकरून या किडी निम्फ व अंडी खातात, ज्यामुळे पांढरी माशी या किडींवर नियंत्रण मिळेल.
  • फवारणीत नीम ऑइलचा वापर करा म्हणजे पानांवर कडवटपणा येईल ज्यामुळे कीड रसशोषण करू शकणार नाही.
  • फवारणीमध्ये सिलिकॉन युक्त उत्पादनांचा वापर करावा. जेणेकरून पाने कडक होतील व रसशोषक कीडींना रसशोषण करता येणार नाही.
  • कॅल्शियम व ‌‌सॅलिसिलिक अॅसिड युक्त उत्पादनांचा वापर फवारणी मध्ये करावा, जेणेकरून रोपांची प्रतिकारशक्ती वाढेल.
  • नायट्रोजन युक्त खतांचा वापर कमी प्रमाणात करावा जेणेकरून पाने कोवळी, लुसलुशीत होणार नाहीत, ज्यामुळे किडी आकर्षित होणार नाहीत.
नियंत्रणात्मक उपाययोजना