Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

डिडिमेला बुरशी (Didymella)

जबाबदार बुरशी 

Didymella lycopersici

पोषक वातावरण 
  • उच्च आद्रता आणि वारंवारचा पाऊस अशा वातावरणात या बुरशीचा प्रादुर्भाव होतो.
  • जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 20°C – 25°C च्या दरम्यान असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
लक्षणे 
  • पानांवरील लक्षणे : पानांच्या कडांवर काळे ठिपके किंवा वर्तुळाकार काळपट डाग दिसतात व पानांच्या शिरांवर आणि मध्यशिरांवर काळे वर्तुळाकार डाग दिसतात.कालांतराने ते तपकिरी होतात व पाने गळून पडतात.
  • खोडावरील लक्षणे : खोडावर देखील मोठ्या आकाराचे काळे किंवा तपकिरी रंगाचे  डाग दिसतात आणि खोड कुज होऊन रोपांची मर होते.
  • फळांवरील लक्षणे: फळांवर काळे, वर्तुळाकार डाग येतात ज्यामुळे फळांची कुज मोठ्या प्रमाणावर होते.
प्रसार 
  • बुरशीचे बीजाणू: Didymella lycopersici या बुरशीचे बीजाणू हवेच्या मार्फत पसरतात. हे बीजाणू पाण्याच्या थेंबांद्वारे देखील पसरू शकतात.
  • संक्रमित बी: रोगग्रस्त बी वापरण्यामुळे हा रोग पसरण्याची शक्यता अधिक असते.
  • माती आणि अवशेष: मातीतील अवशेषांवर बुरशीच्या बीजाणूंचे अस्तित्व असते, जे पुढील पिकासाठी धोकादायक ठरतात.
  • पाणी आणि आर्द्रता: जास्त आर्द्रता व पाण्यामुळे या रोगाचा प्रसार वेगाने होतो.
  • रोगग्रस्त पानांपासून किंवा फळांपासून नवीन पानांवर किंवा फळांवर संक्रमण वाढते.
प्रतिबंधात्मक उपायोजना 
  • नियमितपणे पानांचे आणि फळांचे निरीक्षण करणे आणि रोग लवकर ओळखून त्वरित उपाययोजना करणे.
  • रोपांची लागवड ही योग्य अंतरावर करावी. जेणेकरून हवा खेळती राहील आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जमिनीवर पडेल आणि ओलसरपणा कमी होईल.तसेच पाने पण जास्त काळ ओली राहणार नाहीत.
  • शेतामध्ये कोणतेही काम केल्यानंतर योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव कमी असेल तेव्हा प्रादुर्भावीत रोपे काढून टाकावीत.
उपचारात्मक उपाययोजना