Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

डाऊनी (Downey Mildew)

जबाबदार बुरशी 

Peronospora sparsa

पोषक वातावरण 
  • थंड व सौम्य वातावरणामध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
  • जेव्हा वातावरणामध्ये तापमान 15°C ते 22°C च्या दरम्यान असते व आद्रता ही 85% पेक्षा जास्त असते तेव्हा ही बुरशी मोठ्या प्रमाणात वाढते.
  • पानांवर जास्त काळ ओलसरता राहिल्यास बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.
लक्षणे
  • याची सर्वप्रथम लक्षणे ही रोपांच्या खालील पानांवर दिसतात.
  • रोपांची खालील पाने हे पिवळी पडायला सुरुवात होतात.
  • त्यानंतर या बुरशीचा प्रादुर्भाव रोपांच्या वरच्या भागावर होतो व रोपांची वरील पाने सुद्धा पिवळी पडायला सुरुवात होतात.
  • पिवळी पडलेली पाने कालांतराने जळून जातात व गळतात. यामुळे रोपांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे इतर बुरशीजन्य रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो.
प्रसार 
  • याचा सर्वप्रथम प्रादुर्भाव रोपांची पाने जमिनीला चिकटल्यामुळे रोपांच्या खालच्या पानांवर होतो. त्यानंतर तो वरच्या भागावर पसरतो.
  • तसेच रोपांची पाने एकमेकांला चिकटल्यामुळे या बुरशीचा प्रसार एका रोपावरून दुसऱ्या रोपावर होतो.
  • धुके आणि वारंवार ओलसर हवामान बुरशीचा प्रसार वाढवतात.रोपांची पाने जास्त वेळ ओली राहिल्यामुळे या बुरशीचा प्रसार जलद गतीने होतो. तसेच शेतमजुरांद्वारे सुद्धा या बुरशीचा प्रसार होऊ शकतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • दोन ओळीमधील अंतर हे जास्त असायला हवे जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश हा जमिनीवरती पडेल व जमिनीमध्ये अधिकचा ओलावा राहणार नाही.
  • तसेच या बुरशीचा प्रादुर्भाव दोन रोपांमधील अंतर जास्त असल्यामुळे एका रोपावरून दुसऱ्या रोपावर होणार नाही.
  • पाऊस पडल्यानंतर लगेचच बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.
  • शेतामध्ये कोणतेही काम केल्यानंतर लगेच बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.
उपचारात्मक उपाययोजना