Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

टोमॅटो लीफ मोल्ड (Tomato Leaf Mold)

जबाबदार बुरशी 

Passalora Fulva

पोषक वातावरण 
  • जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 22°C ते 25°C च्या दरम्यान असते व वातावरणामध्ये आद्रता ही 85% पेक्षा जास्त असते. तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. जास्त किंवा कमी तापमानात बुरशीचा विकास मंदावतो. तसेच जेव्हा दाट लागवड केलेली असते आणि वातावरणामधील आद्रता ही जास्त असते, तेव्हा या बुरशीची वाढ जलद गतीने होते.
लक्षणे 
  • पानांवरील ठिपके: सुरुवातीला पानांच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळसर डाग दिसतात.
  • पानांच्या खालच्या पृष्ठभागावर बुरशी: पानांच्या खालच्या पृष्ठभागावर तपकिरी किंवा जांभळट रंगाची बुरशीची थर दिसू लागतात.
  • पाने वाळणे: रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्यावर पाने वाळतात आणि खाली गळून पडतात.
  • फळांवर परिणाम: जरी ही बुरशी मुख्यतः पानांवर प्रादुर्भाव करत असली, तरीही जास्त प्रादुर्भावामुळे फळांचा आकार कमी होतो आणि फळांची गुणवत्ता घटते.
प्रसार 
  • हवेच्या माध्यमातून: Passalora fulva या बुरशीचे बीजाणू हवेच्या माध्यमातून पसरतात.
  • पाण्याच्या थेंबांद्वारे: पाण्याचे थेंब, पाऊस किंवा सिंचन पद्धतींमुळे या बुरशीचे बीजाणू पानांवर पसरतात.
  • रोगग्रस्त अवशेष: जमिनीत राहिलेले रोगग्रस्त वनस्पतींचे अवशेष पुढील पिकांना संसर्गित करतात.
  • संसर्गित उपकरणे: सिंचन यंत्रणा किंवा कामाचे उपकरणे जर स्वच्छ नसतील तर त्यांच्याद्वारे रोगाचा प्रसार होऊ शकतो.
प्रतिबंधात्मक उपायोजना 
  • दोन रोपांमधील अंतर हे योग्य असायला हवे, जेणेकरून हवेचा प्रवाह चांगला राहील.
  • पाण्याचे योग्य नियोजन करावे , एकदमच रोपांना पाणी न देता गरजेनुसार थोडे थोडे पाणी द्यावे.
  • सकाळच्या वेळी पाणी द्यावे, जेणेकरून पिके दिवसभर सुकतील आणि ओलसरता कमी होईल.
  • शेतात कोणतेही काम केल्यानंतर योग्य त्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • रोगग्रस्त पाने व वनस्पतीचे अवशेष त्वरित काढून टाकावेत.
उपचारात्मक उपाययोजना