Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

फायटोपथोरा रोपमर (Phytophthora Wilt)

जबाबदार बुरशी 

Phytophthora capsici

पोषक वातावरण 
  • जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 25 – 30°C च्या दरम्यान असते व उच्च आद्रता असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने होतो.
लक्षणे 
  • सर्वात लक्षणीय लक्षण म्हणजे रोपे अचानक कोमजून जातात. विशेषत: उष्ण हवामानात रोपांचे खोड जेथे जमिनीला चिकटलेले असते तेथे गडद पाण्याने भिजलेले घाव दिसतात. ज्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचे वहन बंद होते. हे घाव तपकिरी ते काळ्या रंगाचे असतात. तसेच रोपांची पाने पिवळी आणि नंतर तपकिरी होतात आणि सुकून गळून पडतात. कालांतराने या बुरशीचा प्रादुर्भाव वाढून रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होते.
प्रसार 
  • या बुरशीचा प्रसार माती आणि पाण्यामार्फत होतो. जमिनीमधील अधिकच्या  ओलाव्यामुळे या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होत असतो. बुरशीचे बीजाणू दीर्घकाळ मातीमध्ये असतात आणि ते निरोगी रोपांवर आक्रमण करतात. तसेच शेतात काम करणारा मजुरांच्या मार्फत सुद्धा या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • रोपांची लागवड ही योग्य अंतरावर करावी, जेणेकरून हवा खेळती राहील आणि ओलसरता कमी होईल .
  • शेतामध्ये कोणतेही काम केल्यानंतर योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव कमी असेल तर प्रादुर्भावित रोपे काढून टाकावीत.
  • शेतामध्ये जास्त वेळ ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
उपचारात्मक उपाययोजना