Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

स्टेमफिलियम राखाडी ठिपके (Stemphyllium Spot)

जबाबदार बुरशी 

✅Stemphyllium solani

पोषक वातावरण 
  • जेव्हा तापमान हे 20°-30°C च्या दरम्यान असते व आद्रता ही 80% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
लक्षणे 
  • टोमॅटो पिकात या बुरशीजन्य रोगाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत.
    पानांवर : या बुरशीजन्य रोगाची लक्षणे वनस्पतींच्या सर्व पानांवर दिसायला सुरुवात होते. ज्यामध्ये पानांवर तांबट रंगाचे ठळक ठिपके दिसतात. ज्यांना एकदम लहान आकाराची पिवळी प्रभावळ असते. एका पानावर एका पेक्षा जास्त ठिपके असतात. कालांतराने जसा प्रादुर्भाव वाढत जातो तसे ठिपक्यांचा आकार वाढत जातो व पूर्णपणे पान कोरडे पडते.
    फांद्या आणि खोड : या बुरशीजन्य रोगाची लक्षणे वनस्पतीच्या फांद्या आणि खोडावर दिसायला सुरुवात होतात. ज्यामध्ये काळ्या रंगाचे चट्टे दिसतात. कालांतराने त्या चट्ट्यांचा आकार वाढतो आणि फांदी व खोड पूर्णपणे खराब होते.
प्रसार
  • स्टेमफिलियम राखाडी ठिपके हा बुरशीजन्य रोग Stemphyllium solani या बुरशीमुळे होतो. या बुरशीचा बिजाणू जुन्या पिकांच्या अवशेषांमध्ये व टोमॅटोच्या बियांमध्ये असतात. या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात वारा व अधिकच्या पावसामुळे होत असतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • टोमॅटो रोपांची लागवड करताना पावसाळी हंगामामध्ये दोन टोमॅटो ओळींमधील अंतर हे पाच फुटापेक्षा जास्त असावे. यामुळे सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे रोपांच्या खालील पानांवर पडतो. तर उन्हाळी व हिवाळी हंगामामध्ये 4.5 फुट असावे. ज्यामुळे जमिनीमध्ये ओलावा कमी वेळ राहतो, पानांवरती मातीचे कण चिटकून राहत नाहीत.
    जेव्हा या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावासाठी व प्रसारासाठी पोषक वातावरण तयार होते, तेव्हा लगेच स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
    जास्त पाऊस पडल्यानंतर जेव्हा खालील पानांवर माती उडते, तेव्हा लगेच स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.
    जेव्हा शेतामध्ये मजुरांच्या साह्याने एखादे काम करून घेतो, जसे की बांधणी भांगलणी इ. त्यानंतर लगेचच बुरशीनाशकाची फवारणी करावी.
उपचारात्मक उपाययोजना