Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

टोमॅटो ग्रे मोल्ड (Tomato Gray Mold)

जबाबदार बुरशी

Botrytis Cinerea

पोषक वातावरण
  • जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 15 ते 25°C च्या दरम्यान असते व वातावरणामधील आद्रता ही 90% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
लक्षणे
  • पानांवरील ठिपके: पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसू लागतात. हे ठिपके नंतर तपकिरी किंवा करडया रंगाचे होतात.
  • फुलांवरील लक्षणे: फुले करडी व काळपट होतात आणि शेवटी गळून पडतात.
  • फळांवरील ठिपके: फळांवर करडे, पाणीदार असे ठिपके दिसतात. हे ठिपके नंतर वाढतात आणि फळांचा पृष्ठभाग मऊ होऊन तो कुजतो.
  • खोडावरील लक्षणे: खोड करड्या रंगाचे होऊन कुजते आणि रोपांची वाढ खुंटते.
प्रसार
  • हवेच्या माध्यमातून: Botrytis cinerea या बुरशीचे बीजाणू हवेच्या माध्यमातून पसरतात.
  • पाण्याच्या थेंबांद्वारे: पाण्याच्या थेंबांद्वारे या बुरशीचा प्रसार होतो. पावसाळ्यात किंवा ओलसर हवामानात प्रसार वेगाने होतो.
  • संक्रमित अवशेष: रोगग्रस्त वनस्पतींचे अवशेष जमिनीत राहिल्यास, पुढील पिकांसाठी संसर्गाची शक्यता वाढते.
  • उच्च आर्द्रता: उच्च आर्द्रता आणि कमी तापमानामुळे बुरशीची वाढ आणि प्रसार जलद होतो.
प्रतिबंधात्मक उपायोजना
  • दोन ओळी मधील अंतर हे जास्त असायला हवे, जेणेकरून पानांवर सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे पडतो आणि बुरशीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात होतो.
  • शेतामध्ये मजुरांच्या साह्याने कोणतेही काम केल्यावर लगेचच बुरशीनाशकांची फवारणी करावी.
  • सकाळच्या वेळी सिंचन करावे  जेणेकरून पिके दिवसभर सुकतील आणि ओलसरता कमी होईल.
  • पाऊस पडून गेल्यानंतर शेतात लगेचच बुरशीनाशकाची फवारणी करावी.
उपचारात्मक उपाययोजना